Shiv Thakare Grand Welcome At Home : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) शोचा फिनाले रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदाच्या ‘बिग बॉस १६’ च्या विजेतेपदावर एमसी स्टॅन (Mc stan) याचं नाव नोंदवण्यात आलं. यंदाच्या बिग बॉसची ट्रॉफी शिव ठाकरे (shiv thakare) किंवा प्रियंका चौधरी (Priyanka Chaudhari) जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण शेवटच्या क्षणी पूर्ण खेळ एक वेगळ्या दिशेने गेला. बिग बॉस संपल्यानंतर स्पर्धक नव्या दिशेने वाटचाल करत आहेत, तर दुसरीकडे शिव ठाकरे त्याच्या गावी अमरावतीमध्ये पोहोचला आहे. शिव ठाकरेच्या स्वागतासाठी अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली. शिवाय शिवच्या स्वागतासाठी कुटुंबियांनी दारात फुलांची रांगोळी काढली. (Shiv thakare family)
Bigg Boss 16 घरात आणि चाहत्यांच्या मनात राज्य केल्यानंतर शिव ठाकरे अमरावतीमध्ये दाखल होताच चाहत्यांनी आणि शिवच्या कुटुंबियांनी त्याचं जंगी स्वागत केलं. सध्या सोशल मीडियावर शिवच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते आणि कुटुंबियांसोबत शिव प्रचंड आनंदी दिसत आहे.
#BreakingNews
Inside Sources says…
After seeing the Craze of Amravati #ArchanaGuatam thinking of proposing #ShivThakare? on IG Live tomorrow
Her Dream to marry MP might be fulfilled this way pic.twitter.com/n0aBUVlCw4— (@BB16king) February 14, 2023
सध्या सर्वत्र शिवच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिवचे चाहते गाण्यांवर ठेका धरताना दिसत आहेत.
Craze of #ShivThakare
Roads blocked, crackers bursting, music, dhol & crowd shouting and going crazy. #ShivKiSena #BB16 #BiggBoss @colorstv @BiggBoss pic.twitter.com/yTkvV7uv8F
— edico_sane) February 14, 2023
शिव ठाकरे बिग बॉसच्या घराती दरदार स्पर्धकांपैकी एक होता. खुद्द बिग बॉसने शिवचं कौतुक केलं होतं. ज्यामुळे शिव प्रचंड भावुक झाला आणि ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले. (shiv thakare instagram)
बिग बॉसनंतर शिव ठाकरे रोहित शेट्टी याच्या ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये दिसणार आहे. एवढंच नाही शिव अनेक सिनेमांमध्ये झळकण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिग बॉस १६मध्ये शिव ठाकरे याला संपूर्ण देशाचं प्रेम मिळालं. सध्या सर्वत्र शिवच्या नावाची चर्चा आहे.
शिव सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर शिवच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिव कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असतो. आता शिवला आता ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचली आहे.