Shiv Thakare | निमृत कौरवर प्रेम की फक्त मैत्री? अखेर शिव ठाकरेनं नात्याबद्दल केला खुलासा

शिवने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याचा खुलासा केला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो बिग बॉस 16 मधील प्रवास आणि निमृत कौर आहलुवालियासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने साजिद खानसोबतच्या मैत्रीवरही प्रतिक्रिया दिली.

Shiv Thakare | निमृत कौरवर प्रेम की फक्त मैत्री? अखेर शिव ठाकरेनं नात्याबद्दल केला खुलासा
शिव ठाकरे - निमृत कौरमध्ये नेमकं काय शिजतंय? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 12:37 PM

मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन संपल्यानंतर शिव ठाकरे सातव्या आकाशावर आहे. शिवने ट्रॉफी जरी जिंकली नसली तरी त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या त्याच्यावर विविध ऑफर्सचा वर्षाव होतोय. एकीकडे ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्य सिझनसाठी त्याचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवला एका चित्रपटाचीही ऑफर मिळाली आहे. शिवने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याचा खुलासा केला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो बिग बॉस 16 मधील प्रवास आणि निमृत कौर आहलुवालियासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने साजिद खानसोबतच्या मैत्रीवरही प्रतिक्रिया दिली.

शिव ठाकरे हा बिग बॉस 16 चा फर्स्ट रनर-अप ठरला. तर प्रियांका चहर चौधरी सेकंड रनर-अप ठरली. विजेता एमसी स्टॅन आणि शिव ठाकरेची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली. त्याशिवाय शिव आणि निमृत कौर आहलुवालियाच्या जोडीला नेटकऱ्यांनी खूप पसंत केलं. चाहत्यांनी या जोडीला ‘शिवृत’ असं नाव दिलं. शिव आणि निमृत यांनी एकमेकांना डेट करावं, अशीही इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

शिव आणि निमृतमध्ये नेमकं काय शिजतंय?

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे म्हणाला, “फक्त रोमँटिक बोलून काही होत नाही. त्यासाठी हृदयाची घंटी वाजावी लागते आणि माझ्याबाबतीत हे सर्व खूपच हटके आहे. मी कधी समोरच्याची खिल्ली उडवतो तर कधी त्याची मस्करी करतो. ते नातं वेगळंच असतं. माझं आणि निमृतचंही नातं असंच मैत्रीपूर्ण आहे. आम्ही एकमेकांसोबत भावनिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. माझ्या डोळ्याला मार लागला होता, तेव्हा तिने माझी काळजी घेतली. पण आमच्यातील हे नातं मनात गिटार वाजण्यासारखं नाही. जर रोमँटिक बाँड असती तर ती एका बाजूला आणि संपूर्ण जग दुसऱ्या बाजूला. मी तिच्यासाठी खूप काही केलं असतं.”

साजिद खानसोबतच्या मैत्रीबद्दलही तो या मुलाखतीत व्यक्त झाला. “मैत्रीत फायदा पाहिला जात नाही. मग ती कितीही मोठी व्यक्ती असू दे, कितीही मोठा दिग्दर्शक असू दे. तो त्याच्या जागी आणि मैत्री आपल्या जागी असते. जर ती व्यक्ती चांगली असेल तर माझी त्या व्यक्तीशी खूप चांगली मैत्री होते. जर मी त्या भूमिकेसाठी योग्य नसतो तर मला ऑफर मिळालीच नसती. 100 कोटी रुपये घ्या आणि उधळपट्टी करा, असं कोणी करत नाही”, असं शिव म्हणाला.

इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे शिवने चाहत्यांना सांगितलं की त्याला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. त्यासाठी मिटींगसुद्धा पूर्ण झाली आहे. या प्रोजेक्टमध्ये बॉलिवूडचे मोठमोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.