KKK13 | शिव ठाकरे याला मोठी दुखापत, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, व्हिडीओ व्हायरल

शिव ठाकरे याला खरी ओळख ही बिग बाॅस 16 मधून मिळालीये. सोशल मीडियावरही शिव ठाकरे याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिव ठाकरे हा खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाला आहे. खतरों के खिलाडी 13 धमाल करताना शिव ठाकरे हा दिसत आहे.

KKK13 | शिव ठाकरे याला मोठी दुखापत, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 3:49 PM

मुंबई : खतरों के खिलाडी 13 ची शूटिंग सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू आहे. टीव्ही स्टार खतरों के खिलाडी 13 (Khatron Ke Khiladi 13) मध्ये धमाका करताना दिसत आहेत. बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गाैतम हे देखील खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे बिग बाॅसमध्ये असल्यापासून यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळतो. खतरों के खिलाडी 13 मध्येही यांचे भांडणे होताना सातत्याने दिसत आहेत. तुनिशा शर्मा प्रकरणात शीजान खान (Sheezan Khan) याच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. शीजान खान हा देखील खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाला आहे.

नुकताच शिव ठाकरे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हि़डीओमध्ये शिव ठाकरे याच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे शिव ठाकरे याच्या हाताला अनेक टाके देखील पडल्याचे दिसत आहे. आता शिव ठाकरे याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण बघायला मिळत आहे.

शिव ठाकरे याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आरशाच्या समोर जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर शिव ठाकरे हा मोबाईलचा कॅमेरा आपल्या हाताकडे फिरवतो आणि त्याची जखम दाखवतो. यामध्ये शिव ठाकरे याच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही टाके टाकल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शिव ठाकरे याने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील धक्का बसला. शिव ठाकरे याने शेअर केलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर कमेंट करत शिव ठाकरे याला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. अनेकांनी नेमके काय झाले हा प्रश्न देखील शिव ठाकरे याला विचारला आहे.

खतरों के खिलाडी 13 मध्ये स्टंट करत असताना शिव ठाकरे याला ही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अनेकांना स्टंट करत असताना दुखापत झालीये. काही दिवसांपूर्वी अर्चना गाैतम हिने देखील एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये अर्चना गाैतम हिला देखील दुखापत झाली होती. शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 मध्ये जबरदस्त गेम खेळताना दिसला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.