शिव ठाकरेसोबत असलेल्या नात्यावर डेजी शाहचं मोठं वक्तव्य
Shiv Thakare : 'आमच्या दोघांमध्ये...', सलमान खानच्या अभिनेत्रीसोबत संसार थाटणार मराठमोळा शिव ठाकरे? बिग बॉसमुळे चर्चेत आलेला शिव ठाकरे आता खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत... खरंच अभिनेता करणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्न?
अभिनेता शिव ठाकरे याला आज कोणत्याचं ओळखीची गरज नाही. अभिनेता आता त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शिव ठाकरे अभिनेता सलमान खान याची अभिनेत्री डेजी शाह यांच्या नात्याच्या चर्चा देखील सर्वत्र रंगत असतात. गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे आणि डेजी शाह यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे. रिलेशिपच्या रंगलेल्या चर्चांवर आणि लग्नाच्या चर्चांवर डेजी हिने मौन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘आतापर्यंत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. पण आता लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. शिव आणि माझ्यामध्ये काहीही नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. एक वेळ अशी होती जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती आणि मला काहीही माहिती नव्हतं. कोणीतरी माझा हात पकडला आणि मला मार्ग दाखवला…’
‘शिव याला पहिल्यांदा भेटली. त्याने अनेक रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. ज्यामुळे त्याचा अनुभव देखील फार मोठा आहे. शिव कायम मला सल्ले देत असतो. मी सिनेमांमध्ये काम केलंय, त्यामुळे सिनेमांचा अनुभव मला आहे. मी शिव याला सिनेमांबद्दल सांगत असते.’
View this post on Instagram
शिव याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘आमच्या दोघांमध्ये फार घट्ट नातं आहे. त्यामुळे आम्ही कायम एकमेकांसोबत बोलत असतो. जेव्हा तुम्ही कोणत्या मुलासोबत अधिक बोलता तेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये असतील.. अशी चर्चा रंगलेली असते.’
स्वतःच्या लव्हलाईफबद्दल देखली डेजी हिने मोठा खुलासा केला. ‘माझी फसवणूक झाली आहे. जो मला सतत अटेन्शन देईल असा जोडीदार मला हवा आहे. पण कधी मला अन्टेशन हवं असतं, तर मला कधी अन्टेशनची गरज नसते. सर्वात आधी मला स्वतःला समजून घेण्यची गरज आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
डेजी शाह हिच्याबद्दल सांगायचं झालंतर, अभिनेत्री सलमान खान याच्यासोबत ‘जय हो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘जय हो’ सिनेमानंतर देखील डेजीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.