शिवानी रांगोळे, तितीक्षा तावडेचे ‘व्हॅलेंटाइन डे’चे खास प्लॅन्स

व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून या दिवसासाठी अनेक जोडपी खास प्लॅन करतात. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनी या दिवसाचा खास प्लॅन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडेसाठी हा व्हॅलेंटाइन खूपच खास असणार आहे.

शिवानी रांगोळे, तितीक्षा तावडेचे 'व्हॅलेंटाइन डे'चे खास प्लॅन्स
शिवानी रांगोळे, तितीक्षा तावडेचे 'व्हॅलेंटाइन डे'चे खास प्लॅन्स Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 3:53 PM

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | अक्षरा आणि नेत्राच्या अभिनयाच्या प्रेमात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. अक्षरा-अधिपती आणि नेत्रा-अद्वैतची जोडी मालिकांमध्ये गाजतेय. या जोड्यांचं प्रेम तर प्रेक्षक टीव्ही स्क्रीनवर पाहतच असणार. पण ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अक्षराची भूमिका साकारणारी शिवानी रांगोळे आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये नेत्राची भूमिका साकारत असलेली तितिक्षा तावडे त्यांच्या आयुष्यातील प्रेमाच्या व्यक्तींविषयी बोलल्या आहेत. या दोघांनी त्यांचे व्हॅलेंटाइन डेचे प्लॅन्स चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

शिवानी रांगोळनं सांगितलं, “माझ्या जीवनातली ती खास व्यक्ती सर्वांनाच माहिती आहे. तो विराजस आहे. आमच्यामध्ये पती-पत्नीच्या नात्याआधी आमची मैत्री आहे. ज्यामुळे नात्यामध्ये एक वेगळाच ताजेपणा आहे आणि आसपास शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकाला आवडणाऱ्या गोष्टी करतो. आमचा व्हॅलेंटाइन डेचा प्लॅन असा आहे की दोघांनाही घरच्या जेवणाची खूप आवड आहे तर काहीतरी घरीच बनवून खायला आम्हाला दोघांना आवडेल. सोबतच एखादी छान फिल्म किंवा सीरिज बघू. विराजसला मला या माध्यमातून सांगायचंय की तू नवरा होण्याआधी माझा मित्र आहेस आणि याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. दहा-बारा वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो आणि आपण एकमेकांची प्रगती होताना पहिली आहे. प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहेस तर जसा आहे तसाच राहा. कधीही बदलू नकोस.”

हे सुद्धा वाचा

तितिक्षा तावडे म्हणाली, “प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मी खूप एक्स्प्रेसिव्ह आहे. ज्या व्यक्तींवर माझं प्रेम आहे, त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं आणि त्यांना जाणीव करून देणं की तुमची काळजी करायला मी आहे ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. माझ्या त्या प्रिय व्यक्तीला म्हणजेच सिद्धार्थ बोडकेला एक निरोप देईन की प्रेम काय आहे हे कोणी अजून डिकोड नाही केलंय. तर आपण दोघं मिळून ते डिकोड करण्याचा प्रयत्न करू. थोडं तू चूक, थोडं मी चुकते आणि चुकीतून शिकून मोठं होऊ आणि भरभरून प्रेम करायला शिकू. 14 फेब्रुवारीला ‘सातव्या मुलीची सातव्या मुलगी’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये मी व्यस्त असेन. पण त्यानंतर जो काही थोडा वेळ मिळणार आहे, तो मी सिद्धार्थ बरोबर घालवणार आहे.”

शिवानी रांगोळेची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका रात्री 8 वाजते तर तितीक्षा तावडेची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.