लग्नाच्या दीड वर्षांनीच पतीला सबा इब्राहिम देणार घटस्फोट? व्हिडीओमध्ये खुलासा करत…
शोएब इब्राहिम याची बहीण सबा इब्राहिम हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सबा इब्राहिमची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सबा इब्राहिम दिसते. आता नुकताच तिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिची ननंद आणि अभिनेता शोएब इब्राहिम याची बहीण अर्थात सबा इब्राहिम ही कायमच चर्चेत दिसत आहे. सबा इब्राहिम व्लॉगच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सोशल मीडियावरही सबा चांगलीच सक्रिय दिसते. दीपिका कक्कर आणि सबा इब्राहिम या मैत्रिणींसारखे राहतात. काही दिवसांपूर्वीच व्लॉगमध्ये सबा इब्राहिम आणि तिच्या पतीचे जोरदार भांडणे होताना दिसले. मात्र, तो एक फक्त मजाक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सबा इब्राहिम हिच्या लग्नाला फक्त दीड वर्षपूर्ण झाली आहेत. आता नुकताच नव्या व्लॉगमध्ये अत्यंत हैराण करणारा खुलासा सबा इब्राहिम हिने केला आहे. सबा इब्राहिम हिचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. सबा इब्राहिम म्हणाला की, लोकांना मी आणि सनीने केलेला मजाक अजिबातच आवडला नाही. आता यानंतर आम्ही असे करणार नाही.
मी तर थेट आता घटस्फोटाचेच सांगणार होते. मात्र, नुसते घटस्फोटाचे सांगून लोकांना विश्वास बसणार नाही म्हणून मी घटस्फोटाचे कागदपत्रेही तयार करणार होते. मात्र, तुम्हाला भांडणाचा मजाक आवडला नसल्याने मी आता ते करणार नाही. सबा इब्राहिम हिचे हे बोलणे ऐकून तिचा पती सनी हा देखील हैराण होतो.
सबा इब्राहिम हिला सनी म्हणतो की, हे नको..तू असे कसे बोलत आहे. मात्र, सबा इब्राहिमने स्पष्ट केले की, ती आता यापुढे असा मजाक करणार नाहीये. मात्र, सबा इब्राहिम ही खरोखरच पतीसोबत घटस्फोट घेणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. सबा इब्राहिमची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
आता सबा इब्राहिम हिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक म्हणत आहेत की, हे लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. शोएब इब्राहिम आणि दीपिका यांच्या मुलाला खास गिफ्ट बर्थडेचे देताना सबा इब्राहिम ही दिसली होती. पतीसोबत मुंबईमध्येच सबा इब्राहिम ही राहते.