‘या’ क्रिकेटपटूंनी थाटलाय तीन वेळा संसार, यादीत भारतीय कर्णधाराचं देखील नाव
cricketers married : 'या' भारतीय क्रिकेटपटूने देखील थाटलाय तीन वेळ संसार, दुसऱ्या पत्नीबद्दल जाणून व्हाल हैराण... अनेक क्रिकेपटूंनी केलंय तिसरं लग्न... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्याची चर्चा
cricketers married life : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पाकिस्तानचा मजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सानिया मिर्झा हिला घटस्फोट दिल्यानंतर शोएब याने शनिवारी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर शोएब याने पत्नीसोबत रोमाँटिक फोटो देखील पोस्ट केले आहे. तिसरं लग्न असल्यामुळे शोएब याला ट्रोलिंगचा देखील समाना करावा लागत आहे. सांगायचं झालं तर, फक्त शोएब मलिक यानेच नाही तर, त्याच्या आधी देखील अनेक क्रिकेटपटूंनी तीन वेळा संसार थाटला आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या माजी क्रिकेटपटूचं देखील नाव आहे.
सनथ जयसूर्या : श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya)ने तीनदा लग्न केलं आहे. जयसूर्याचं पहिलं लग्न 1998 मध्ये झालं होतं. पण सनथ याचं पहिलं लग्न एक वर्ष देखील टिकलं नाही. त्यानंतर सनथ याने दुसरं लग्न सँड्रा डी सिल्वासोबत केलं.
सनथ जयसूर्या याचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं. दुसऱ्या लग्नानंतर सनथ जयसूर्या याने तिसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. सनथ याने तिसरं लग्न मालिका सिरिसेना हिच्यासोबत केलं. गुपचूप सनथ याने तिसरं लग्न केलं. दोघांच्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती होतं.
इम्रान खान : पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी देखील तीन वेळा लग्न केलं आहे. इम्रान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथशी पहिलं लग्न केलं. 2004 मध्ये इम्रान यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. यानंतर इम्रान खान यांनी रेहम खानशी लग्न केलं, पण त्यांचं लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर इम्रान यांनी 2018 मध्ये बुशरा मानेकसोबत तिसरे लग्न केलं. इम्रान खान कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.
मोहम्मद अझरुद्दीन : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी देखील तीन लग्न केली आहेत. अझरुद्दीन यांचं पहिलं लग्न नौरीनसोबत झालं होतं. मात्र, करिअरच्या शिखरावर असताना अझरुद्दीन अभिनेत्री संगीता बिजलानीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नौरीनपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर अझरुद्दीन यांनी संगीतासोबत लग्न केले.
संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2010 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या घटस्फोटानंतर अहजरुद्दीन यांनी तिसरं लग्न शॅनन मेरीसोबत केलं. पण तिसरं लग्न फक्त अफवा असल्याचं अझरुद्दीन यांनी सांगितलं होतं. पण त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.