शोएब मलिकचे तिसऱ्या पत्नीसोबत ‘ते’ क्षण, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘दोन्ही देशांकडून फक्त शिव्या आणि…’

Shoaib Malik | 'दोन्ही देशांकडून फक्त शिव्या आणि...', सानिया मिर्झा, मुलाची साथ सोडल्यानंतर तिसऱ्या पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगतोय शोएब मलिक, 'ते' फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, सोशल मीडियावर शोएब मलिकचे पत्नीसोबत फोटो व्हायरल

शोएब मलिकचे तिसऱ्या पत्नीसोबत 'ते' क्षण, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोन्ही देशांकडून फक्त शिव्या आणि...'
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 9:40 AM

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासोबत असलेला संसार मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब – सानिया यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यनंतर शोएब याने तिसरं लग्न पाकिस्तानची अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत केलं. सना हिच्यासोबत शोएब आता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. नुकताच शोएब याने तिसऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा केला.

शोएब याने पत्नी सना हिच्या वाढदिवसाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील राग येईल. तिसऱ्या पत्नीसोबत आनंदाचे क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत शोएब याने कॅप्शनमध्ये, प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र शोएब आणि सना यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

शोएब आणि सना यांचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांवर संताप व्यक्त केला आहे. कमेंटच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी शोएब आणि सना यांच्यावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दोन्ही देशांचे नागरिक शिव्या देत आहेत..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘असं काम केलंय दोन्ही देशांचे नागरिक तुमचा तिरस्कार करत आहेत…’

तिसरा नेटकरी म्हणाला, ‘रमजान सुरु आहे थोडी तरी लाज बाळग…’, ‘2024 मधील कोणालाही न आवडलेलं कपल…’, फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत सानिया मिर्झा हिचं समर्थन करत आहेत. सांगायचं झालं तर, 24 जानेवारी रोजी शोएब याने तिसऱ्या लग्नाची घोषणा केली.

शोएब याच्या तिसऱ्या लग्नावर फक्त भारत देशाने नाही तर, पाकिस्तानने देखील विरोध दर्शवला. सोशल मीडियावर शोएब – सना यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लग्नानंतर देखील सना हिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सानिया मिर्झा आणि मुलाची साथ सोडून नवा संसार थाटल्यामुळे शोएब याचा दोन्ही देशांनी विरोध केला.

सानिया मिर्झा – शोएब मलिक

2010 साली पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक याच्यासोबत भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने लग्न केलं होतं. तेव्हा अनेकांनी दोघांच्या लग्नाचा विरोध केला. कारण सानियासोबत शोएबचं दुसरं लग्न होतं. लग्नानंतर सानिया हिने मुलाला जन्म दिला. पण शोएब याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

शोएब याचं पहिल लग्न आयशा सिद्दीकी हिच्यासोबत झालं होते. आयशा सिद्दीकी हिने शोएबवर अनेक गंभीर आरोप केले. एप्रिल 2010 मध्ये पहिली पत्नी आयशा सिद्दीकी हिला घटस्फोट दिला. गेल्या काही दिवसांपासून शोएब त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.