शोएब मलिकचं तिसरं तर सनाचा दुसरा विवाह, पाहा कोण आहे तिचा पहिला स्टार अभिनेता पती

Shoaib Malik - sania mirza : शोएब मलिकने सना जावेद सोबत तिसरा विवाह केला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा आहेत. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. दोघांची चर्चा असताना आता यामध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा होत आहे. कोण आहे तो व्यक्ती.

शोएब मलिकचं तिसरं तर सनाचा दुसरा विवाह, पाहा कोण आहे तिचा पहिला स्टार अभिनेता पती
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 4:46 PM

Sania Mirza and Shoaib Malik separated? : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक सानिया मिर्झापासून विभक्त झाल्यानंतर आज तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. शोएब मलिक सकाळपासून मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर ट्रेंड होत आहे. पण त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. शोएब आणि सना जावेद यांच्या निकाह दरम्यान हा व्हायरल होत असलेला व्यक्ती कोण आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

ही व्यक्ती कोण आहे

उमैर जसवाल असे या व्यक्तीचे नाव आहे. उमेर जसवाल हा सना जावेदचा पहिला पती आहे. सना जावेदने 2020 मध्ये उमैरशी लग्न केले होते, त्यानंतर त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि गेल्या वर्षी त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. उमैर जसवाल हा पाकिस्तानी गायक आणि अभिनेता आहे. घटस्फोटापूर्वी सना आणि उमैरने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो डिलीट केले होते.

सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिच्या आणि शोएब मलिकच्या नात्यात दुरावा आल्याचं दिसत होते. या पोस्टमध्ये सानिया मिर्झाने म्हटले होते की, ‘लग्न कठीण आहे की घटस्फोट घेणे कठीण आहे. सर्वात कठीण काय ते निवडा. लठ्ठपणा कठीण आहे की तंदुरुस्त राहणे कठीण आहे. कर्जात अडकणे कठीण आहे की आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. तुमची निवड करणे कठीण आहे की संप्रेषण कठीण आहे. संवाद साधणे कठीण नाही. जीवन कधीही सोपे होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल. पण आपण आपली मेहनत निवडू शकतो. यानंतर सानियाची आणखी एक इन्स्टाग्राम पोस्ट समोर आली ज्यामध्ये तिने लिहिले होते – जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयाची शांती भंग करते, तेव्हा त्याला सोडले पाहिजे.’

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक विभक्त झाल्याचे बोलले जात आहे. शोएब मलिकने शनिवारी जाहीर केले की त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. शोएब आणि सानिया यांच्यातील नाते बिघडल्याच्या 2022 पासून जोरदार अफवा होत्या. काही दिवसांपूर्वी शोएबनेही सानियाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.