खासदार कंगना रनौत यांच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना, तीनवेळा मरता मरता वाचल्या
Kangna Ranaut | खासदार झालेल्या कंगना रनौत यांच्याबद्दल 'ही' धक्कादायक घटना फार कमी लोकांना आहे माहिती, तीनवेळा मरता मरता वाचल्या... लोकसभा निवडणूक जिंकून आल्यानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत यांची चर्चा...
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख तर निर्माण केलीच आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. कंगना यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकावला आहे. प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे कंगना यांच्या खासगी आयुष्याची देखील तुफान चर्चा रंगली आहे. कंगना यांच्याबद्दल काही अशा गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहे. मोठ-मोठे संकट पेलावणाऱ्या कंगना यांच्याबद्दल थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांना ड्राईव्ह करता येत नाही.
सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धकड’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कंगना यांनी स्वतःबद्दल मोठा खुलासा केला होता. कंगना यांना ड्राईव्ह करता येतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर कोणताही संकोच न बाळगता कंगना यांनी नाही… असं उत्तर दिलं.
कंगना रनौत म्हणाल्या, ‘मला ड्राईव्ह करता येत नाही. मी शिकण्यासाठी प्रयत्न केला, पण मला जमलं नाही… जेव्हा मी ड्राईव्हींग शिकत होती, तेव्हा माझ्या कारचा तीनवेळा अपघात झाला. त्यानंतर मी कधीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला नाही.’ असं कंगना रनौत म्हणाल्या होत्या.
दरम्यान, खासदार झाल्यानंतर कंगना रनौत बॉलिवूडमध्ये सक्रिय राहाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कंगना यांचा बहुप्रतीक्षीत ‘इमरजेन्सी’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सिनेमात कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. सिनेमा कंगना रनौत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
कंगना रनौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्यांदा निवडणूक लढवत कंगना रनौत यांनी बाजी मारली आहे. कंगना यांनी 74755 मतांनी विजय मिळवला आहे. कंगना यांना 537022 मत दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत यांची चर्चा रंगली आहे.