रिहानाविषयी पूर्वी काय सर्च केलं जायचं?; गुगल ट्रेंडची धक्कादायक माहिती काय?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच पार पडलंय. या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. प्री वेडिंग फंक्शनमध्ये फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक सहभागी झाले. रिहाना देखील या प्री वेडिंग फंक्शनसाठी भारतात दाखल झाली.

रिहानाविषयी पूर्वी काय सर्च केलं जायचं?; गुगल ट्रेंडची धक्कादायक माहिती काय?
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 2:06 PM

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त भारतच नव्हे तर विदेशातूनही पाहुणे हे दाखल झाले. या प्री वेडिंग फंक्शनची जय्यत तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. हेच नाही तर पाहुण्यांसाठी खास राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली. या लग्नात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाकडून डाएट प्लॅन हा मागवण्यात आला. हेच नाही तर नात्यामध्ये 700 पदार्थ आणि जेवणात 2500 पदार्थ हे वाढले गेले.

या प्री वेडिंग फंक्शनमधील सर्वाधिक चर्चेत जर कोणते नाव राहिले असेल तर ते म्हणजे रिहाना हिचे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी रिहाना हिने तब्बल 74 कोटी रुपये फीस ही घेतली. प्री वेडिंग फंक्शनमध्ये रिहाना हिने तब्बल 19 गाणी गायली. भारतीयांसोबत धमाल करताना रिहाना ही नक्कीच दिसली. रिहानाचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसले.

रिहाना तूफान चर्चेत असून भारतामध्ये गुगल ट्रेडमध्ये रिहाना हीच आहे. या अगोदरही रिहाना एकदा भारतात गुगलचा ट्रेंड बनली होती. पॉप स्टार रिहाना ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर रिहाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. रिहाना तिच्या एका शोसाठी कोट्यवधी रूपये फीस ही घेते.

2021 मध्ये रिहानाचे नाव भारतामध्ये ट्रेंडमध्ये आले होते. रिहाना हिने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल पोस्ट शेअर केली. त्यावेळी गुगल सर्च ट्रेंडमध्ये लोकांना रिहाना हिचा धर्म जाणून घ्यायचा होता. गुगल ट्रेंडनुसार रिहाना मुस्लिम आणि रिहाना रिलिजनलाही खूप सर्च करण्यात आले. या ट्विटनंतर तिची लोकप्रियताही खूप वाढली आहे. हेच नाही तर ट्विटरवर तिचे 1 मिलियन फॉलोअर्स त्यावेळी वाढले होते.

भारतात शेतकरी आंदोलन सुरू होते, त्यामुळे दिल्लीच्या आसपासच्या भागात इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यावेळी एक लेखही प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यामध्ये आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर नवी दिल्लीत इंटरनेट बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावरच रिहाना हिने लिहिले होते की, आम्ही यावर का बोलत नाही?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.