सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींचा खतरनाक प्लान पोलिसांनी केला उघड
अभिनेता सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण आता या प्रकरणाकडे आणखी गांभिर्याने पाहिलं जात आहे. कारण सलमानच्या घरावर शनिवारी गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात आली आहे.
Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर शनिवारी रात्री दोन जणांनी गोळीबार केला होता. बिहारमधील पश्चिम चंपारण येथील मसिही येथून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विकी गुप्ता (२४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (२१) अशी या आरोपींची नावे आहेत. दोन्ही गोळीबार करणाऱ्यांनी पाच राऊंड फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सलमान खानला सतत जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा देखील देण्यात आली होती. पण आता या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
अनमोल बिश्नोईची फेसबुक पोस्ट
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घटनेपूर्वी तीन वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोई याने या घटनेबाबत फेसबुकवर एक पोस्टही लिहिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनमोल बिश्नोई हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे.
पोलिसांनी पुढे माहिती दिली की, लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल याच्या सांगण्यावरून राजस्थानचा गँगस्टर रोहित गोदारा याने सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचे काम या दोघांना दिले होते. या दोघांचाही थेट अनमोलशी संबंध आहे.
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे अभिनेत्याचे कुटुंब खूपच अस्वस्थ आहेत. याप्रकरणी पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. अरबाज खाननेही सोमवारी निवेदन जारी केले आहे. ही घटना त्यांच्यासाठी खूपच अस्वस्थ करणारी असल्याचं त्याने म्हटलं आहे. दरम्यान या घटनेनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडला आहे.
View this post on Instagram
सलमान खानच्या घरावर झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबारासाठी वापरलेल्या मोटारसायकलच्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. नुकतेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे समोर आले होते.