अमिषा पटेलच्या गदर 2 चित्रपटाचं शुटिंग सुरू, ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या आठवणींना दिला उजाळा
मला एका श्रीमंत बापाची मुलगी म्हणून नेहमी हिणवलं जायचं, सेटवर मी कधीही हसली नाही कोणाशी बोलली नाही, मी माझे पुस्तक नेहमी वाचत बसायची कारण मला पुस्तकं वाचायची प्रचंड आवड होती.
मुंबई – अनेकांची चित्रपट क्षेत्रातील करिअर कसं घडलं हे अनेकांना माहिती आहे. त्यामध्ये अनेक कलाकारांना पटकन प्रसिध्दी मिळाली, तर अनेकांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. सद्या अमिषा पटेलची (amisha patel) जोरदार चर्चा सुरू आहे. अमिषा पटेलचं कहो ना प्यार है या चित्रपटापून बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण केल. ‘कहो ना प्यार है’ (kaho na pyar hai) चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन (hrithik roshan) सुध्दा मुख्यभूमिकेत दिसला होता, तसेच हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांची जोडी कहो ना प्यार है चित्रपटात अनेकांना आवडली होती. त्यानंतर अमिषा पटेलने गदर (gadar) आणि हमराज (hamraj) या चित्रपटात काम केले आहे. तिन्ही चित्रपटात चांगलं काम केल्यानंतर अमिषा पटेलचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. सद्या बराच काळ ओलाडल्यानंतर अमिषा पटेल पुन्हा नव्या पडद्यावर पुनरागन करणार आहे. सद्या ‘गदर 2’ चे शुटिंग सुरू असून त्या चित्रपटात अमिषा सनी देओलसोबत पुन्हा दिसेल.
एका मुलाखती दरम्यान अमिषा पटेलने मागच्या काही गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तिने सुरूवातीचा काळ कसा होता याबाबत भाष्य केलं आहे. त्यामध्ये तिने कहो ना प्यार है चित्रपटाच्या संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. कारण अमिषा पटेलचा पहिला चित्रपट कहो ना प्यार है होता. त्यावेळी लोक तिला अंहकारी म्हणत होते. तसेच मोठ्या बापाची मुलगी आहे. बिघडलेली मुलगी असल्याचे समजले जात होते.
View this post on Instagram
या कारणामुळे पुस्तक वाचायची
मला एका श्रीमंत बापाची मुलगी म्हणून नेहमी हिणवलं जायचं, सेटवर मी कधीही हसली नाही कोणाशी बोलली नाही, मी माझे पुस्तक नेहमी वाचत बसायची कारण मला पुस्तकं वाचायची प्रचंड आवड होती.
View this post on Instagram
पण मर्सिडीजमधून आल्याचा कधी दिखावा केला नाही
हातात घेतलेलं पुस्तक 3 ते 4 दिवसात मी वाचून संपवायची, त्यामुळे कोणाशीही सेटवरती अधिक बोलत नव्हती. माझ्यासोबतचे लोक मला अहंकारी आणि गर्विष्ठ असल्याचे सांगत होते. तसेच मी मर्सिडीजमधून शुटिंगला यायचे तेव्हाही लोक माझ्यावर विनोद करताना मी पाहिली आहेत. हृतिक मारूतीमधून येतो आणि अमिषा मर्सिडीजमधून आली असं म्हणून लोकं चिडवायची. पण कधीही मर्सिडीज दिखावा केला नाही.
View this post on Instagram
अमिषाचे गाजलेले चित्रपट
- कहो ना प्यार है
- गदर
- हमराज
राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video
कॅटरीनाचे मालदीवमधील फोटो पाहून मुंबईत थंडीने कुडकुडलेल्यांना घाम फुटू शकतो! एकदा बघाच
हृतिकच्या व्हायरल व्हिडीओची नेटक-यांमध्ये चर्चा, सोबत असलेली व्यक्ती जाणून घेण्यास चाहत्यांची उत्सुकता