श्रद्धा कपूरने सोडलं आई – वडिलांचं घर? ‘या’ अभिनेत्याच्या घरात होणार शिफ्ट

Shraddha Kapoor: 'स्त्री 2' सिनेमाच्या यशानंतर श्रद्धआ कपूर हिने सोडलं आई - वडिलांचं घर? आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात शिफ्ट होणार श्रद्धा कपूर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

श्रद्धा कपूरने सोडलं आई - वडिलांचं घर? 'या' अभिनेत्याच्या घरात होणार शिफ्ट
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 11:54 AM

अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘स्त्री 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री ‘स्त्री 2’ सिनेमाच्या यशाची चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर ‘स्त्री 2’ सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील विक्रम रचला आहे. ‘स्त्री 2’ सिनेमाचं यश अनुभवत असताना, श्रद्धाच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूर हिने नवं घर घेतलं आहे. श्रद्धा लवकरच बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या घरात शिफ्ट होणार आहे. तर श्रद्धा अभिनेता अक्षय कुमार याची शेजारीन होणार आहे.

रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर हिने अभिनेता हृतिक रोशन याचा सी-फेसिंग अपार्टमेंट रेंटवर घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल, हृतिकचं घर रेंटवर घेणार होते. पण आता अभिनेत्याचं आलिशान घर श्रद्धा कपूर हिने रेंटवर घेतल्याची माहिती समोर येत आहे. हृतिकच्या घरात शिफ्ट झाल्यानंतर श्रद्धा अभिनेता अक्षय कुमार याची शेजारीन होईल.

हे सुद्धा वाचा

नव्या घराबद्दल अद्याप श्रद्धा कपूर हिने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. सांगायचं झालं तर, ‘स्त्री 2’ सिनेमात अभिनेता अक्षय कुमार याने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे. ‘स्त्री 2’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं सिनेमाने आतापर्यंत 401.55 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर संपूर्ण जगभरात सिनेमाने 589 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

‘स्त्री 2’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री 3’ सिनेमाची देखील घोषणा केली आहे. सिनेमाचा तिसरा भाग पूर्णपणे श्रद्धा कपूर हिच्यावर आधारलेला असणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ‘स्त्री 2’ सिनेमाच्या यशानंतर सोशल मीडियावर श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.