लोक पाहतच बसले.. इतक्या कोटींच्या कारमधून श्रद्धा कपूर पोहोचली दिवाळी पार्टीत

श्रद्धा कपूरने काही दिवसांपूर्वीच लॅम्बॉर्गिनी हुरेकन टेकनिका ही अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली होती. ही कार श्रद्धा स्वत: चालवताना दिसते. दिवाळीच्या पार्टीतही श्रद्धा स्वत: लॅम्बॉर्गिनी चालवत पोहोचली होती. तिच्या या ग्रँड एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.

लोक पाहतच बसले.. इतक्या कोटींच्या कारमधून श्रद्धा कपूर पोहोचली दिवाळी पार्टीत
Shraddha Kapoor Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 11:01 AM

मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | देशभरात सध्या दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा धूमधडाक्यात दिवाळी साजरी करत आहेत. सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांचा खास दिवाळी लूक पहायला मिळतोय. विविध सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं जातंय आणि या पार्ट्यांना फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार ग्लॅमरस अंदाजात एण्ट्री घेत आहेत. या सर्वांत अभिनेत्री श्रद्धा कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष चर्चेत आला आहे. पापाराझींनी श्रद्धाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. श्रद्धाने निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. मात्र तिच्या लूक आणि ड्रेसपेक्षा सर्वाधिक चर्चा तिच्या ग्रँड एण्ट्रीची झाली. श्रद्धा तिच्या अत्यंत महागड्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये या पार्टीला पोहोचली होती. विशेष म्हणजे ही कार ती स्वत: चालवत आली होती.

श्रद्धाने काही दिवसांपूर्वीच ही लाल रंगाची लॅम्बॉर्गिनी कार विकत घेतली होती. रिपोर्ट्सनुसार या कारची किंमत जवळपास 4.04 कोटी रुपये आहे. कार खरेदी केल्यानंतर श्रद्धा अनेकदा ती चालवताना दिसली होती. मात्र दिवाळी पार्टीतील तिच्या ग्रँड एण्ट्रीची गोष्टच वेगळी आहे. लाल रंगाची लॅम्बॉर्गिनी कार स्वत: चालवत ती पार्टीला पोहोचली आणि त्यातून एखाद्या राणीसारखी ती बाहेर पडली. तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

‘तिला पुरुषाची गरजच नाही. किंबहुना तिला ड्रायव्हरचीही गरज नाही. श्रद्धाचा अॅटिट्यूड खूपच कूल आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘गर्ल पॉवर.. ज्या पद्धतीने ती लॅम्बॉर्गिनी कार चालवत आली आणि कारमधून एखाद्या राजकुमारीसारखी उतरली, ते खरंच नेत्रसुखद आहे. श्रद्धाबद्दलची प्रत्येक गोष्ट कौतुकास्पद आहे,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘बॉस लेडी’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. श्रद्धा कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, मार्चमध्ये ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिने रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.