Shraddha Kapoor : कोण आहे श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड? अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये दोघांची दमदार एन्ट्री
Shraddha Kapoor : कोणी अभिनेता गायक नाहीतर, 'हा' आहे श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड! अनंत - राधिका यांचं प्री-वेडिंग पण सर्वांच्या नजरा फक्त श्रद्या आणि तिच्या बॉयफ्रेंडवर... व्हिडीओ व्हायरल.. सध्या सर्वत्र श्रद्धाच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | 3 मार्च 2024 : जामनगर मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांची चर्चा सर्वत्र रंगली आहे. प्री-वेडिंग कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सोशल मीडियावर सेलिब्रिटींची फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत. पण अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची एन्ट्री झाली आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. कारण अनंत – राधिका यांच्या आयुष्यातील खास दिवसासाठी श्रद्धा एकटी नाही तर, बॉयफ्रेंड राहुल मोदी याच्यासोबत उपस्थित होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात श्रद्धा आणि राहुल यांनी एकत्र एन्ट्री केली. श्रद्धाला राहुल याच्यासोबत पाहिल्यानंतर दोघांनी त्यांचं नातं घोषित केलं आहे का? अशी चर्चा देखील जोर धरत आहे. सांगायचं झालं तर, श्रद्धा आधी रोहन श्रेष्ठ याला डेट करत असल्याची चर्चा होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
आता श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा राहुल मोदी याच्यासोबत होत आहे. पण राहुल मोदी नक्की कोण आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तो काय काम करतो… याबद्दल फार कोणाला माहिती नाही. तर आता जाणून घेवू राहुल मोदी कोण आहे. राहुल मोदी लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. राहुल याने ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमात श्रद्धा हिच्यासोबत काम केलं.
‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमात राहुल याने दिग्दर्शक लव रंजन याच्यासोबत लेखकाचं काम केलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा आणि राहुल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. राहुल याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, राहुलने ‘पर्सनल अत्याचार – सीजन 1’ शोमध्ये स्पर्धक म्हणून सुरुवात केली..
‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ आणि ‘लाइफ विदाउट वाइफ’ यांसख्या मालिकांमध्ये देखील राहुल याने काम केलं आहेत. एवंढच नाहीतर, ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमांमध्ये देखील राहुल मोदी याने महत्त्वाची भूमिका साकारली.