अखेरची चिठ्ठी लिहीत होतो, पण स्वामींचा झालेला तो साक्षात्कार…, भूषण कडूच्या आयुष्यात असं काय घडलं?

Bhushan Kadu | स्वतःला संपवणार होतो, पण स्वामींचा झालेला तो साक्षात्कार कधीच विसरणार नाही, त्या माणसांना कधीच विसणार नाही... अखेरची चिठ्ठी लिहीत असताना भूषण कडूच्या आयुष्यात असं काय घडलं? कोरोना नंतर अभिनेत्याच्या आयुष्यात आलेला अंधार...

अखेरची चिठ्ठी लिहीत होतो, पण स्वामींचा झालेला तो साक्षात्कार..., भूषण कडूच्या आयुष्यात असं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 11:50 AM

अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. पण अभिनेत्याच्या आयुष्यात आलेल्या वाईट दिवसांनी मात्र भूषण याचा आनंद हिरावूण घेतला. कोरोना काळात पत्नी कादंबरी कडू यांची प्राणज्योत मालवली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तेव्हा भूषण याचा मुलगा फक्त 11 वर्षांचा होता. मुलाला होणारा त्रास पाहून आभिनेत्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण सुसाईट नोट लिहित असताना स्वामींच्या झालेल्या त्या साक्षात्कारामुळे अभिनेत्याने पुन्हा नव्या आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने स्वामींचा झालेला तो साक्षात्कार कधीच विसरणार नाही असं म्हटलं..

भूषण म्हणाला, एक घटना घडली माझ्यासोबत… खूप frustrated झालो होतो. स्वतःला संपवण्याचा विचार देखील केली. मुलाचं दुःख पाहू शकत नव्हतो. स्वतःच्या काळजाला त्रास होत होता. मुलाला काही देऊ शकत नव्हतो. बाप मोठा कलाकार आहे. मुलाला देखील कळत असेल पण तो काहीही बोलला नाही. सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.

सुसाईट नोट लिहिण्यासाठी सुरुवात केली. कारण मुलाला सांगायचं होतं, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. माझ्या बायकोवर माझं किती प्रेम होतं… सुसाईट नोटमध्ये सर्वकाही मांडायचं होतं. पण समाधन होईना, सुसाईट नोट लिहिण्यासाठी रोज बसायचो… पंधरा पानं लिहून झाली. पण नोट काही संपेना…

हे सुद्धा वाचा

एके दिवशी घरातील सामान घेण्यासाठी बाहेर आलो. तेव्हा घडलेली घटना माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना ठरली. खाली उतरल्यानंतर जवळपास पाच माणसं भेटली. त्यांनी मला विचारलं भूषण कडू… मी म्हणालो हो… ते म्हणाले, तुमचं काम चांगलं आहे. पण अशी का अवस्था करुन घेतली आहे? मी त्यांना सुद्धा म्हणालो, सोडून द्या मला माझ्या मरणावर… त्या व्यक्तींमध्ये सगळ्यात शेवटी एक व्यक्ती होती, त्यांचं नाव विकास दादा पाटील…

ठाण्यामध्ये श्री स्वामी समर्थ मठाचे विकास दादा पाटील मटाधिपती आहेत. त्यांनी मला सांगितलं उद्या मठात या… माझी सुसाईट नोट सुरूच होती… मी दुसऱ्या दिवशी गेलो मठात.. आयुष्यात एका क्षणी माणूस इतका frustrated होतो, तो देवाची परीक्षा घ्यायला निघतो… माझ्याबाबतीत देखील असंच झालं. गेलो मठात विचारलं स्वामींना, काय स्वामी तुम्हाला एवढी लोकं मानतात… अशक्य ही शक्य करतील स्वामी असं म्हणतात. स्वामींच्या पाया पडलो विकास दादा पाटील यांना भेटलो…

तेव्हा विकास दादा पाटील यांनी माझं ब्रेनवॉश करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत मी देखील काही गोष्टी शेअर केल्या. त्यादिवशी प्रसन्न वाटलं. ते म्हणाले रोज यायचं आता मठात. मी देखील जाऊ लागलो. मुलगा शाळेत जायचा, मी मठात जायचो… हळूहळू सुसाईट नोट लिहिणं बंद झालं. मठातील लोकांकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले. आर्थिक मदत देखील होऊ लागली. आयुष्य किती सुंदर किती आहे, जगणं किती महत्त्वाचं आहे… त्या लोकांनी मला सांगितलं. तेव्हा ठरवलं स्वतःला संपवायचं नाही तर, जगाचयं… कारण एवढी चांगली माणसं भेटली आहेत, त्यांची परतफेड करायची असेल तर जगणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी काम करणं आहे हे एकमेव पर्याय आहे… असं अभिनेता म्हणाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.