कॉलेज सक्रेटरीच्या प्रेमात होता Shreyas Talpade; अभिनेत्याची भन्नाट ‘लव्हस्टोरी’

पहिल्या नजरेत कॉलेज सक्रेटरीच्या प्रेमात पडला होता श्रेयस, लग्न झालं आणि...; तुम्हाला माहितीये अभिनेत्याची 'लव्हस्टोरी'

कॉलेज सक्रेटरीच्या प्रेमात होता Shreyas Talpade; अभिनेत्याची भन्नाट 'लव्हस्टोरी'
कॉलेज सक्रेटरीच्या प्रेमात होता Shreyas Talpade; अभिनेत्याची भन्नाट 'लव्हस्टोरी'
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 1:49 PM

Shreyas Talpade Love story : सेलिब्रिटी कायम त्यांचं खासगी आयुष्य गुपित ठेवतात. पण चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. सध्या चर्चा रंगत आहे प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याच्या लव्हस्टोरीची. श्रेयसने फक्त मराठी सिनेविश्वातच नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज श्रेयसच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या अभिनयाप्रमाणेच त्याची लव्हस्टोरी देखील प्रचंड खास आहे.

श्रेयसच्या पत्नीचं नाव दिप्ती आहे. आज आपण श्रेयस आणि दिप्ती यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. कॉलेजच्या एका फेस्टमध्ये श्रेयसला बोलावण्यात आलं होतं. तेव्हा कॅलेजच्या सेक्रेटरीला म्हणजे दिप्तीला पाहून, पहिल्या नजरेतच श्रेयस दिप्तीच्या प्रेमात पडला.

२००० साली जेव्हा अभिनेत्याला कॉलेजच्या एका फेस्टमध्ये बोलावण्यात आलं होतं, तेव्हा दिप्ती कॉलेजची सेक्रेटरी होती. फेस्टमध्ये श्रेयसने दिप्तीला पाहिलं आणि दोघे पहिल्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीनंतर चार दिवसांनंतर श्रेयसने दिप्तीला प्रपोज केलं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २००४ मध्ये श्रेयस आणि दिप्तीने लग्न केलं. शुटिंगमधून एक दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, करियरच्या सुरुवातीलाच अभिनेत्याने लग्न केलं.

श्रेयसने ‘इकबाल’ सिनेमातून करियरची सुरुवात केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं. सिनेमाची शुटिंग सुरु होण्याआधी श्रेयसने लग्नासाठी सुट्टी मागितली. तेव्हा दिग्दर्शकांनी सुट्टी रद्द केली. पण तेव्हापर्यंत लग्नाची पत्रिका वाटून झाल्या होत्या. अशात दिग्दर्शकांनी विचार केला की, श्रेयस सिनेमात डेब्यू करत आहे आणि अशात लग्न केल्यास वाईट परिणाम होतील.

पण श्रेयसने दिग्दर्शकांना सांगितलं की, मी लग्नाबद्दल कोणालाही सांगणार नाही. तेव्हा लग्नासाठी अभिनेत्याला एका दिवसाची सुट्टी मिळाली आणि श्रेयस आणि दिप्तीचं लग्न झालं. लग्नाच्या १४ वर्षांनंतर ४ मे २०१८ साली श्रेयस आणि दिप्ती सरोगेसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.