आयुष्यातील ती सर्वांत भयानक संध्याकाळ.. श्रेयस तळपदेच्या पत्नीची भावूक पोस्ट
अभिनेता श्रेयस तळपदेला अखेर रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. 14 डिसेंबर रोजी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने अंधेरीतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नीने भावूक पोस्ट लिहिली आहे.
मुंबई : 21 डिसेंबर 2023 | अभिनेता श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला आहे. याबद्दलची माहिती त्याची पत्नी दिप्ती तळपदेनं सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. श्रेयसच्या प्रकृतीबद्दलची माहिती देतानाच दिप्तीने तिच्या भावनाही व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांनी तिला साथ दिली, मदत केली, त्यांचेही तिने आभार मानले. 14 डिसेंबर रोजी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर श्रेयस घरी परतला होता. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पत्नीने रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान झालं आणि तातडीने श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली.
दिप्ती तळपदेची पोस्ट-
‘माझं आयुष्य, श्रेयस सुखरुप घरी परतला आहे. मी श्रेयसशी वाद घालत म्हणायचे की कोणावर विश्वास ठेवावा हे मला कळत नाही. आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. देवावर विश्वास ठेवावा. ज्या संध्याकाळी आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली, तेव्हा तो माझ्यासोबत होता. यापुढे मी त्याच्या अस्तित्वावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ‘
मी श्रेयसशी वाद घालत असे म्हणायचे की माझा विश्वास कुठे ठेवावा हे मला माहित नाही. आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे, सर्वशक्तिमान देव. आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता. मला वाटत नाही की मी यापुढे त्याच्या अस्तित्वावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करेन. या शहरातील काही चांगल्या व्यक्तींचे मी आभार मानू इच्छिते. त्या संध्याकाळी मी मदतीसाठी हाक मारताच 10 जण माझ्या मदतीला धावून आले. श्रेयस जेव्हा कारमध्ये होता, तेव्ही आपण कोणाची मदत करतोय हे त्या लोकांना माहीत नव्हतं. तरीसुद्धा ते धावून आले. ज्या ज्या लोकांनी त्या संध्याकाळी माझी मदत केली, ते माझ्यासाठी देवाच्या दूतासारखे आहेत. माझा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी आशा करते. मी मनापासून तुमची आभारी आहे. मुंबई या शहराची ही किमया आहे आणि अशाच लोकांमुळे मुंबई बनली आहे. गरजेच्या काळात आम्हाला त्यांनी एकटं सोडलं नाही, आमची काळजी घेतली गेली”, अशा शब्दांत दिप्तीने कृतज्ञता व्यक्त केली.
View this post on Instagram
‘मी माझे मित्रमैत्रिणी, कुटुंबीय आणि फिल्म इंडस्ट्रीचेही आभार मानते. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतून अनेकांनी काळजी, प्रेम व्यक्त केलं. आपल्या हातातली सर्व कामं सोडून काहीजण माझ्यासोबत तिथे होते. तुम्हा सर्वांमुळे मी एकटी पडले नाही. बेलेव्यू रुग्णालयाच्या टीमचेही मी मनापासून आभार मानते. त्यांनी तातडीने उपचार करून माझ्या पतीचे प्राण वाचवले. सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर्स, बॉइज, मावशी, मामा, ॲडमिन आणि सेक्युरिटी या सर्वांचे जितकं आभार मानावं तितकं कमी आहे. श्रेयसच्या सर्व चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली, त्यांच्यासाठीही माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. तुमच्या प्रेमामुळे, प्रार्थनांमुळे आणि आशीर्वादामुळेच आम्ही या कठीण काळावर मात करू शकलो. त्या संध्याकाळी तुम्हा प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून देवाने माझी मदत केली’, असं तिने पुढे लिहिलं आहे. दिप्तीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.