Shreyas Talpade याची कशी आहे प्रकृती? कुटुंबाकडून मोठी हेल्थ अपडेट

Shreyas Talpade : 'श्रेयस याने आमच्याकडे पाहिलं आणि...', अँजिओप्लास्टीनंतर कशी आहे श्रेयस तळपदे याची प्रकृती, कुटुंबियांनी दिली मोठी हेल्थ अपडेट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीची चर्चा...

Shreyas Talpade याची कशी आहे प्रकृती? कुटुंबाकडून मोठी हेल्थ अपडेट
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 3:17 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अभिनेत्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येताच, चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता श्रेयस याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. आता अभिनेत्याची प्रकृती कशी आहे आणि त्याला कधी रुग्णालयातून डिस्चार्स मिळणार? यावर श्रेयस याच्या कुटुंबियांनी मौन सोडलं आहे.

कशी आणि श्रेयस तळपदे याची प्रकृती?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी श्रेयस याने कुटुंबियांकडे पाहिलं आणि हसला. अभिनेत्याची सुधारत असलेली प्रकृती पाहाता कुटुंबियांनी देखील मोकळा श्वास घेतला आहे. श्रेयस याच्या कुटुंबातील एक व्यक्तीने माहिती दिली आहे. अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

कुटुंबियांनी श्रेयस याच्या प्रकृतीबद्दल दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रेयस याची प्रकृती पूर्वीपेक्षा अधिक उत्तम आहे. आज सकाळी आमच्याकडे पाहून तो हसला… आम्हा सर्वांसाठी ही दिलासादायक बाब आहे. काही दिवसांनंतर तो स्वतः तुमच्यासोबत बोलेल…’ अशी माहिती सध्या समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काय म्हणाली श्रेयस याची पत्नी?

‘माझ्या पतीची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही चिंता आणि काळजी व्यक्त केली… त्यासाठी आभार. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि लवकरच रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल…’ असं अभिनेत्याची पत्नी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हणाली.

सांगायचं झालं तर, 47 वर्षीय अभिनेता त्याच्या आगामी सिनेमाचं शुटिंग करत होता. शुटिंग संपल्यानंतर घरी परतल्यानंतर श्रेयस याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो जमीनीवर कोसळला. त्यानंतर श्रेयस याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

श्रेयस तळपदे याचा आगामी सिनेमा

श्रेयस तळपदे ‘वेलकम 3’चे शूटिंगमध्ये व्यस्त होता. सिनेमात श्रेयस याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, तुषार कपूर आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. वेलकम 3 मध्ये अर्शद वारसी आणि संजय दत्त देखील दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. वेलकम 3 सिनेमाचं नाव वेलकम टू द जंगल असं आहे. सिनेमा 2024 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.