कोविशील्डमुळेच आलाय श्रेयस तळपदे याला हार्ट अटॅक? म्हणाला, ‘लस घेतल्यानंतर मला…’

Shreyas Talpade on Covidshield | 'कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण लस घेतली, आपलं दुर्भाग्य...' कोविशील्डमुळेच आलाय श्रेयस तळपदे याला हार्ट अटॅक? अभिनेत्याचा मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस तळपदे याची चर्चा...

कोविशील्डमुळेच आलाय श्रेयस तळपदे याला हार्ट अटॅक? म्हणाला, 'लस घेतल्यानंतर मला...'
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 8:09 AM

अभिनेता श्रेयस तळपदे याला 2023 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्याची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबिय आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. श्रेयस याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करत एंजियोप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेता पूर्वी प्रमाणे शुटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. दुर्दैवी घटनेबद्दल सांगत अभिनेता म्हणाला, कोविड-19 लस आणि हार्ट अटॅक यांचा काहीही संबंध नाही हा सिद्धांत नाकारू शकत नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्याने कोविड-19 लसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

श्रेयस म्हणाला, ‘मी धूम्रपान करत नाही. मी नियमित दारू देखील पीत नाही. मी कधीतरी महिन्यातून एकदा दारू पीतो. तंबाकू देखील मी खात नाही. माझं कोलेस्ट्रॉल काही प्रमाणात वाढलं होतं. आता सध्या माझं कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात आहे. यासाठी मी औषधं घेत आहे…’

‘माझ्याकडे दुसरं कणतंच कारण नाही. मला डायबीटिज देखील नाही. बीपीचा मला कोणता त्रास नाही…. तर हार्ट अटॅकचं कारण काय असू शकतं? इतकी सावधगिरी बाळगून देखील असं होत असेल तर, याचं कारण वेगळं असेल… असं देखील अभिनेता म्हणाला.

पुढे कोविड-19 लसीबद्दल अभिनेता म्हणाला, ‘काही सिद्धांत असे आहे जे मी नाकारू शकत नाही. फक्त कोविड-19 लस घेतल्यानंतर मला थकवा जाणवू लागला. यामध्ये काही तथ्य असू शकतात आणि आपण ते नाकारु शकत नाही. आपल्याला माहिती नाही लसाच्या माध्यमातून आपण शरीरात काय घेतलं आहे… हे आपलं दुर्भाग्य आहे..’

‘आपण कंपन्यांवर विश्वास ठेवला. मी यापूर्वी कधीच अशा घटनांबद्दल ऐकलं नाही. लसीमुळे आपल्या शरीरावर कोणते प्रभाव झाले आहेत, हे मला जाणून घ्यायचं आहे. माझ्याकडे पुरेसे पुरावे असल्याशिवाय कोणतेही विधान करणे व्यर्थ आहे. तरीही त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे मला जाणून घ्यायचे आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

श्रेयस याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘गोलमाल 3’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.