श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, अभिनेत्याची प्रकृती आता…

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त... सध्या चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीची चर्चा...

श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, अभिनेत्याची प्रकृती आता...
Shreyas Talpade
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 8:04 AM

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीची चर्चा होत आहे. गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अभिनेत्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. श्रेयस रुग्णालयात असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी त्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. एवढंच नाही तर, पत्नी दिप्ती तळपदे यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत श्रेयस याची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती दिली. आता पुन्हा श्रेयस याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

श्रेयस याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दहा मिनिटं त्याच्या हृदयाची धडधड थांबली असल्याची माहिती अभिनेता बॉबी देओल याने दिली. आता श्रेयस याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती आहे. अभिनेत्याला रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी रुग्णालयातून सोडतील अशी माहिती समोर येत आहे.

श्रेयस याचा मित्र आणि दिग्दर्शक सोहम शाह याने अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. सोहम शाह म्हणाला, ‘श्रेयस याला रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी रुग्णालयातून सोडतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे…’ सध्या श्रेयस याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे सोहम शाह म्हणाला, ‘श्रेयस याला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच दिवशी मी त्याची भेट घेतली. आज देखील मी त्याच्यासोबतच होतो. श्रेयस याला पुन्हा हसताना आणि बोलताना पाहून मला आनंद होत आहे. त्याच्या पत्नीचे मी आभार मानेल, तिने योग्यवेळी येग्य निर्णय घेतला…’ असं देखील श्रेयस याचा मित्र सोहम शहा म्हणाला…

अभिनेत्याला लवकर रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्यामुळे चाहते देखील आनंदी आहे. सांगायचं झालं तर, ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्यानंतर श्रेयस मुंईत त्याच्या घरी पोहोचला. मुंबईतच अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केल्यानंतर आता अभिनेत्रीची प्रकृती सुधारत आहे. श्रेयस याच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली.

श्रेयस तळपदे याचा आगामी सिनेमा

श्रेयस लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात श्रेयस याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, तुषार कपूर आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  सिनेमा 2024 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.