श्रेयस तळपदेच्या नव्या चित्रपटाची घोषणा; माजी मुख्यमंत्र्यांच्या पूर्व पत्नीसोबत करणार काम

अजाग्रत हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खूपच खास असणार आहे. कारण सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे. यामध्ये तो माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पूर्व पत्नीसोबत काम करणार आहे.

श्रेयस तळपदेच्या नव्या चित्रपटाची घोषणा; माजी मुख्यमंत्र्यांच्या पूर्व पत्नीसोबत करणार काम
Shreyas Talpade and radhika kumaraswamyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 7:26 PM

मुंबई : 17 नोव्हेंबर 2023 | वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदीत आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचं कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकाला तितक्याच ताकदीचं टॅगलाईन लाभल्याने प्रेक्षकांना या रहस्यमय चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची उत्सुत्कता लागली आहे.

या चित्रपटात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची पूर्व पत्नी आणि कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘अजाग्रत’मध्ये सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्याही भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाच्या कथानकात जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने केली आहे. चित्रीकरणस्थळ अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट पॅन इंडिया नेण्याचा मानस आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे.

‘अजाग्रत’ हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच समोर येणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढेल. हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे. आकर्षक कथानक, कलाकार आणि दूरदर्शी दिग्दर्शनासह ‘अजाग्रत’ भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.