Shruti Haasan | “कोण आहे हा?”; मुंबई एअरपोर्टवर अनोळख्या व्यक्तीने केला श्रुती हासनचा पाठलाग अन्..

अभिनेत्री श्रुती हासनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अनोळखी व्यक्ती तिचा पाठलाग करत असते. मुंबई एअरपोर्टवर श्रुतीला हा विचित्र अनुभव येतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Shruti Haasan | कोण आहे हा?; मुंबई एअरपोर्टवर अनोळख्या व्यक्तीने केला श्रुती हासनचा पाठलाग अन्..
Shruti HaasanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 3:09 PM

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार असतात. एअरपोर्ट किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी या सेलिब्रिटींना पाहिलं, की चाहते त्यांच्या अवतीभोवती सेल्फी आणि फोटो क्लिक करण्यासाठी घोळका करतात. अशातच जेव्हा एखादी सेलिब्रिटी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करणाऱ्यांसाठी नेटकऱ्यांची मोठी रांगच लागते. सेलिब्रिटीसुद्धा सर्वसामान्य माणसं असतात, हे अनेकदा चाहते विसरतात. त्यामुळे काही गोष्टी त्यांनासुद्धा अनकम्फर्टेबल वाटू शकतात, याचा अंदाज चाहत्यांना येत नाही. अभिनेत्री श्रुती हासनसोबत नुकताच एक प्रसंग घडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये श्रुती हासन मुंबई एअरपोर्टवरून बाहेर येताना दिसतेय. मात्र एक अनोळखी व्यक्ती तिचा पाठलाग करत असते. पापाराझींनी शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये श्रुती त्यांना विचारताना दिसतेय की, ‘तो कोण आहे?’ त्यानंतर अचानक ती पाठलाग करणारी व्यक्ती श्रुतीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती चिडून त्याला म्हणते, ‘सर मी तुम्हाला ओळखत नाही.’ श्रुतीचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तिच्यासोबत नेमकं काय घडलं, असाही सवाल अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये केला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

नुकतीच अशीच एक घटना ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेतील अभिनेता आकाश चौधरीसोबत घडली. आकाशसोबत सेल्फी क्लिक केल्यानंतर एका तरुणाने त्याच्या दिशेने पाण्याची प्लास्टिकची रिकामी बाटली भिरकावली. ही बाटली आकाशच्या पाठीला लागली. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे हे सर्व पापाराझींसमोर घडत होतं. त्यांनी हा व्हिडीओ शूट केला, मात्र आकाशची मदत करण्याची तसदी घेतली नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

श्रुती सध्या तिच्या आगामी ‘सालार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर प्रशांत नीलने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी प्रशांत नीलने केजीएफ आणि केजीएफ 2 यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.