‘श्श्श्श…कोई है’ फेम गबरू याला ओळखणं देखील कठीण; २२ वर्षांत अभिनेत्यामध्ये मोठे बदल

‘श्श्श्श...कोई है’ मालिकेच्या माध्यमातून सर्वांना घाबरवणारा गबरू आता आहे तरी कुठे, अभिनेत्याला ओळखणं देखील झालं आहे कठीण...

‘श्श्श्श...कोई है’ फेम गबरू याला ओळखणं देखील कठीण; २२ वर्षांत अभिनेत्यामध्ये मोठे बदल
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 1:55 PM

मुंबई | टीव्ही, बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केल्यानंतर काही सेलिब्रिटी अचानक गायब झाले. त्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ फक्त सोशल मीडियावर चर्चेत राहिले. आता देखील असाच एक अभिनेता तुफान चर्चेत आला आहे आणि या अभिनेत्याचं नाव आहे के के गोस्वामी .. गोस्वामी आता अभिनय विश्वात सक्रिय नसला तरी, एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त के के गोस्वामी याच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. के के गोस्वामी याला लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचं प्रेम मिळालं. आता देखील ९० च्या दशकातील मुले के के गोस्वामी याला कधीच विसरु शकत नाहीत. कारण के के गोस्वामी याच्यामुळे ९० च्या दशकातील मुलांच्या असंख्य आठवणी आहेत.

काही वर्षांपूर्वी के के गोस्वामी टीव्ही आणि बॉलिवूड विश्वात सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे.. के के गोस्वामी याने फक्त मालिकांमध्येच नाही तर, अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अभिनेत्याने झगमगत्या विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. पण सर्वांना मालिकांच्या माध्यमातून घाबरवणार आणि विनोदबुद्धीने पोट धरुन हसणारा के के गोस्वामी आता कुठे आहे आणि काय करतो? ही गोष्ट अभिनेत्याच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

‘श्श्श्श…कोई है’ मालिकेत के के गोस्वामी याने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यानंतर २०१० मध्ये प्रसारित झालेल्या ‘कॉमेडी शो गुटूर गु’ या कॉमेडी शोमध्ये केके गोस्वामी पप्पू महाराज या भूमिकेत दिसला. त्यानंतर अभिनेता ‘भाभी जी घर पर है’ आणि ‘त्रिदेवियां’ या मालिकांच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आला…

फक्त मालिकाच नाही तर, अभिनेत्याने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.. ‘भूत अंकल..’ यांसारख्या सिनेमांमुळे अभिनेता तुफान चर्चेत आला.. पण सध्या अभिनेता अभिनयापासून दूर आहे. नुकताच झालेल्या एका मुलखतीमुळे केके गोस्वामी तुफान चर्चेत देखील आला होता. मुलाखतीच्या माध्यमातून अभिनेत्याने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा देखील केला होता.

अभिनेता म्हणाला, ‘टीव्ही क्विन एकता कपूर हिच्याकडून काम मागितलं आहे. शिवाया एकताच्या मॅनेजरकडून तिचा फोन नंबर देखील घेतला आहे…’ केके गोस्वामी सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसला तरी अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

केके गोस्वामी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. अभिनेता कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्यात प्रयत्न करत असतो..

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.