Shubman Gill: ऋषभ पंत-उर्वशीमध्ये काय नातं? शुभमन गिलने सांगितले सर्व सिक्रेट्स

अखेर ऋषभ पंत-उर्वशी रौतेलाचं सत्य आलं बाहेर; शुभमन गिलने केला पर्दाफाश

Shubman Gill: ऋषभ पंत-उर्वशीमध्ये काय नातं? शुभमन गिलने सांगितले सर्व सिक्रेट्स
ऋषभ पंत-उर्वशीमध्ये काय नातं? शुभमन गिलने सांगितले सर्व सिक्रेट्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 8:26 AM

मुंबई: अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांच्यातील वाद जगजाहीर आहे. आधी या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आणि नंतर अचानक दोघं सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारू लागले. या दोघांमध्ये नेमकं काय होतं, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलेला प्रश्न आजपर्यंत अनुत्तरितच राहिला. उर्वशी जेव्हा एका मुलाखतीत पहिल्यांदा RP असं नाव घेतलं, तेव्हापासून तिचं नाव ऋषभ पंतशी जोडलं गेलं. आता या दोघांच्या नात्याबद्दल क्रिकेटर शुभमन गिलने भाष्य केलं आहे. ऋषभ आणि उर्वशी या दोघांच्या रिलेशनशिपबद्दलचे सर्व सिक्रेट्स शुभमने एका मुलाखतीत सांगितले आहेत.

शुभमन गिल सध्या भारतीय टीमसोबत न्यूझीलँडच्या दौऱ्यावर आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर एका पंजाबी कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शोची अँकर ही शुभमनला ऋषभ आणि उर्वशीबद्दल प्रश्न विचारताना दिसते. “आजकाल ऋषभ पंतला एका अभिनेत्रीच्या नावावरून खूप चिडवलं जातं. त्याच्यासोबत टीममध्ये पण असंच होतं का”, असा प्रश्न शुभमनला विचारला गेला.

हे सुद्धा वाचा

या प्रश्नाचं उत्तर देताना शुभमन म्हणतो, “ती स्वत:च स्वत:ला छेडतेय. तिचं ऋषभ पंतशी काही घेणंदेणं नाही. ती स्वत:च काही ना काही करत म्हणतेय की मला छेडा.” या गोष्टीने ऋषभवर काही परिणाम होतो का असा प्रश्न पुढे विचारला असता शुभमने स्पष्ट केलं की, “त्याला काहीच फरक पडत नाही. कारण त्याला माहीत आहे की दोघांमध्ये काहीच नाही.” नंतर अँकर आणि शुभमन दोघं हसू लागतात.

उर्वशी आणि पंतमधील हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा उर्वशीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की आरपी नावाचा व्यक्ती तिला भेटायला हॉटेलमध्ये आला होता. बराच वेळ त्याने तिची वाट पाहिली होती. मात्र त्याच्याशी भेट होऊ शकली नव्हती. नंतर दोघं मुंबईत भेटले. या मुलाखतीनंतर ऋषभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं होतं, ‘बहीण, माझी पाठ सोड. स्वस्त लोकप्रियतेसाठी असं नाही केलं पाहिजे’.

पंतच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघं एकमेकांना टोमणे मारू लागले. पंतच्या पोस्टला उत्तर देताना उर्वशीनेही त्याला ‘छोटू भैय्या’ असं म्हटलं. ‘मी काही मुन्नी नाही, जी तुझ्यासाठी बदनाम होईल’ अशी पोस्ट तिने लिहिली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.