Shubman Gill क्रिकेटसह ‘या’ 22 वर्षाच्या मॉडेलसोबत उतरतोय नवीन व्यवसायात? फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Dec 05, 2023 | 3:07 PM

Shubman Gill : शुबमन गिल 'या' 22 वर्षीय अभिनेत्रीसोबत वळला नव्या व्यवसायाकडे? अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शुबमन गिल याच्या नव्या फोटोंची चर्चा... अभिनेत्रीसोबत फोटो पाहाताच चाहते म्हणाले...

Shubman Gill क्रिकेटसह या 22 वर्षाच्या मॉडेलसोबत उतरतोय नवीन व्यवसायात? फोटो तुफान व्हायरल
Follow us on

मुंबई | 5 डिसेंबर 2023 : भारतील क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू शुबमन गिल कायम त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतो. पण आता शुबमन क्रिकेटमुळे नाही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. शुबमन गिल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून शुबमन यांचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. दरम्यान, शुबमन याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये शुबमन 22 वर्षीय अभिनेत्री आणि दिग्दर्शकासोबत दिसत आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शकासोबत शुबमन याचे काही फोटो व्हायरल होत असल्यामुळे क्रिकेटर म्यूझिक व्हिडीओमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये शुबमन अभिनेत्री अवनित कौर हिच्यासोबत आणि इतर सेलिब्रिटींसोबत दिसत आहे. शुबमन याला पंजाबी गाण्यांची प्रचंड आवड आहे. म्हणून शुबमन नव्या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण याबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

 

 

शुबमन याला अवनीत हिच्यासोबत पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अवनीत कौर हिच्यासोबत… सारा तेंडुलकर हिने पाहिल्यानंतर तिची समज घालणं तुला महागात पडेल…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शुबमन याच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे… त्याला बॉलिवूडमध्ये तर जायचं नाही ना?’, तिसरा नेटकरी म्हणाला ‘शुबमन तुझ्यासाठी क्रिकेट बेस्ट आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शुबमन याच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याची चर्चा…

गेल्या अनेक दिवसांपासून शुबमन यांचं नाव सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. पण सारा अली खान हिने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं. लोकं चुकीच्या सारावर निशाणा साधत आहेत.. असं सारा अली खान म्हणाली होती. अशात शुबमन आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याची चर्चांनी जोर धरला आहे.

अनेक ठिकाणी शुबमन आणि सारा तेंडुलकर यांना स्पॉट देखील करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण शुबमन आणि सारा तेंडुलकर यांना रंगणाऱ्या चर्चांवर मौन बाळगलं आहे. पण तरी देखील शुबमन आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात.