अभिषेकच्या वाढदिवसानंतर बहीण श्वेताची पोस्ट चर्चेत; कोणावर साधला निशाणा?

भाऊ अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त बहीण श्वेता नंदाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र वाढदिवसानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. श्वेताने या पोस्टद्वारे कोणावर निशाणा साधला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अभिषेकच्या वाढदिवसानंतर बहीण श्वेताची पोस्ट चर्चेत; कोणावर साधला निशाणा?
श्वेता बच्चनच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्षImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 11:43 AM

मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. पत्नी ऐश्वर्या राय, बहीण श्वेता नंदा या कुटुंबीयांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बहीण श्वेताने अभिषेकसाठी खास पोस्ट लिहिली होती. मात्र त्यानंतर काही वेळाने श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टवरील मजकूर वाचून श्वेताने नेमका कोणाकडे इशारा केला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबातील तणाव सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा असताना श्वेताच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

श्वेताने मादी लांडग्याबद्दल ही पोस्ट लिहिली आहे. ‘मादी लांडगा त्या सर्व गोष्टींना मागे टाकते ज्या तिला हरवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा ठिकाणी ती स्वत:ला घेऊन जाते जिथे तिला सावरता येईल. कदाचित लांडग्यांकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे किंवा कदाचित आपल्यापैकी काहींनी आधीच ही गोष्ट शिकली असेल.’ श्वेताने या पोस्टद्वारे कोणावर निशाणा साधला आहे, हे स्पष्ट नाही. मात्र अभिषेकच्या वाढदिवशीच तिने ही पोस्ट शेअर केल्याने त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. श्वेता बच्चन बिनधास्तपणे तिची मतं मांडते. मुलगी नव्या नंदाच्या पॉडकास्ट शोमध्ये तिने नुकतीच हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये श्वेता तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि समाजाच्या विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाली.

श्वेता नंदाची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

अभिषेकने 2007 मध्ये ऐश्वर्याशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र त्याबद्दल अद्याप दोघांनी मौन सोडलं नाही. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मुलगी आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. तर अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्यानेही खास पोस्ट लिहिली होती. ‘तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्य मिळो. सदैव चमकत राहा’, अशा शब्दांत तिने शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच ऐश्वर्याने अभिषेक आणि आराध्यासोबतचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.