अमिताभ बच्चन यांना अजिबात पसंत नाही घरातील महिलांचं ‘हे’ काम; लेकीनेच केला खुलासा

नव्या नवेली नंदाच्या व्हॉडकास्टच्या माध्यमातून बच्चन कुटुंबातील अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये श्वेता बच्चनने वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दलच्या एका गोष्टीचा खुलासा केला. घरातल्या महिलांची कोणती गोष्ट त्यांना आवडत नाही, याविषयी तिने सांगितलं.

अमिताभ बच्चन यांना अजिबात पसंत नाही घरातील महिलांचं 'हे' काम; लेकीनेच केला खुलासा
Amitabh Bachchan and Shweta BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:41 PM

मुंबई : 16 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा व्हॉडकास्ट चांगलाच चर्चेत आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’ या तिच्या व्हॉडकास्टचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या नव्या एपिसोडमध्ये नव्याची आई म्हणजेच बिग बींची मुलगी श्वेता बच्चन यांनी वडिलांबद्दल एक खुलासा केला आहे. बिग बींना त्यांच्या घरातील महिलांची किंवा मुलींची एक गोष्ट अजिबात आवडत नसल्याचं श्वेताने सांगितलं. नव्यासोबत गप्पा मारताना श्वेता म्हणाली की, “बाबांना घरातील महिलांचं केस कापणं किंवा छोटे केस ठेवणं अजिबात आवडत नाही. मात्र तरीही त्यांच्या मर्जीविरोधात जाऊन मी नेहमी माझे केस लहान कापायची.”

केस कापण्याचा विषय सुरू असताना श्वेताने तिच्या मुलीला सांगितलं की ती नेहमीच अमिताभ बच्चन यांच्या मर्जीविरोधात जाऊन केस लहान कापायची. यावर नव्या तिला विचारते, “आजोबांना हे आवडायचं नाही ना?” तेव्हा श्वेता सांगते, “त्यांना त्या गोष्टीचा खूप राग यायचा. मी जेव्हा माझे केस कापायची, तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे, हे काय केलंस तू? त्यांना छोटे केस अजिबात आवडायचे नाहीत. त्यांना लांब केसच आवडतात. आमच्यापैकी कोणीच केस कापलेलं त्यांना आवडायचं नाही.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत नव्याने आजी जया बच्चन यांना मॉइस्चराइजरबद्दलही प्रश्न विचारला होता. आजोबांना कोणतं मॉइस्चराइजर आवडतं, असं विचारलं असता जया बच्चन म्हणाल्या, “सरसों का तेल” (राईचं तेल). याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “त्यांची ही खूप युपीची सवय आहे. ते राईच्या तेलालाच अत्यंत गुणकारी मॉइस्चराइजर समजतात. मुलांना राईचं तेलं लावा, असं ते मला सतत सांगायचे. पण त्या तेलाचा वास मला आवडत नाही.” राईच्या तेलाचा विषय निघताच श्वेता तिच्या आई-वडिलांच्या विविध संस्कृतींचा उल्लेख करते. “बंगाली लोक राईच्या तेलात जेवण बनवतात, पण ते शरीराला लावत नाहीत. पण उत्तरप्रदेशचे लोक राईचं तेल शरीराला लावतात”, असं श्वेता सांगते.

अभिनेत्री जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा हे पुन्हा एकदा व्हॉडकास्टनिमित्त एकत्र आले आहेत. या व्हॉडकास्टच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा या अनेक विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. एका सेगमेंटदरम्यान जया बच्चन या लग्न आणि रोमान्स याबद्दल बोलू लागल्या होत्या. “लग्नानंतर रोमान्स उरतच नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.