जया बच्चन यांच्या ‘या’ सवयीला वैतागली श्वेता, म्हणाली, घर सोडून पळून जावे आणि..
Jaya Bachchan and Shweta Bachchan : बच्चन कुटुंबिय कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता वर्ग हा बघायला मिळतो. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आता नुकताच श्वेता बच्चन हिने आई जया बच्चनबद्दल थेट मोठा खुलासा केलाय. यानंतर चाहतेही हैराण झाले.
मुंबई : बच्चन कुटुंबिय कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, याबद्दल अजूनही बच्चन कुटुंबियांकडून काहीही भाष्य करण्यात नाही आले. अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा याने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केलंय. मात्र, अगस्त्य याच्या चित्रपटाला अजिबातच धमाका करता नाही आला. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांनी एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. श्वेता बच्चन हिची मुलगी नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते.
आता नुकताच श्वेता बच्चन हिने नव्याच्या शोमध्ये मोठा खुलासा केलाय. आई जया बच्चन हिच्याबद्दल बोलताना श्वेता बच्चन ही दिसली आहे. नव्याच्या शोमध्ये आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन या पोहचल्या होत्या. यावेळी काही मोठे खुलासे देखील करण्यात आलेत. आता याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
श्वेता बच्चन ही म्हणाली, आई (जया बच्चन)च्या एका सवयीमुळे मला पळून जाण्याची इच्छा कायमच होत. श्वेता बच्चन म्हणाली की, मी लहान असताना आई केसांची आणि त्वचेची खूप जास्त काळजी घेत. आई कायमच केसांना कांद्याचा रस लावत असतं. मला तो कांदाचा वास अजिबातच आवडत नव्हता. तो वास सर्व घरात पसरत असते.
View this post on Instagram
हेच नाही तर त्या कांद्याच्या वासाचा इतका जास्त त्रास होत असत की, मला असे वाटायचे की, पळून जावे. श्वेता बच्चन हिचे हे बोलणे ऐकल्यावर जया बच्चन या म्हणाल्या की, केसांची काळजी घेणे तर महत्वाचे आहे. कांद्याचा रस हा केसांसाठी फायदेशीर आहे. आता श्वेता बच्चन हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच श्वेता बच्चन हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये श्वेता बच्चन ही थेट ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना दिसली. श्वेता हिने या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयींबद्दल खुलासा केला. श्वेता म्हणाली की, ऐश्वर्या राय ही कधीच फोन उचलत नाही. तिची ही सर्वात वाईट सवय आहे. काहीही महत्वाचे काम असले तरीही ऐश्वर्या कधीच फोन उचलत नाही.