श्वेता तिवारी, पलक तिवारी यांचं शिक्षण जाणून व्हाल हैराण, कमावतात कोट्यवधींची माया
Shweta Tiwari - Palak Tiwari | श्वेता तिवारी लेक पलक तिवारी हिच्यासोबत कमावते कोट्यवधींची माया, दोघींच्या शिक्षणाबद्दल जाणून व्हाल हैराण... दोघी कायम त्यांच्या सौंदर्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत, किती शिकल्या आहेत दोघी?
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीची लेक पलक तिवारी हिने देखील सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. फार कमी काळात पलक हिने देखील मोठ्या पडद्यावर स्वतःचं भक्कम स्थान पक्क केलं आहे. श्वेता आणि पलक कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतात. पण आता दोघी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
श्वेता हिच्या मालिका, सिनेमांबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अभिनेत्रीच्या शिक्षणाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तर आज जाणून घेऊ. श्वेता हिचा जन्म उत्तर प्रदेश याठिकाणी झाला होता. पण अभिनेत्रीचं कुटुंब मुंबईत आलं. अभिनेत्रीचं शालेय शिक्षण सेंट इसाबेल्स हायस्कू मध्ये झालं आहे. त्यानंतर अभिनेत्री वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनेत्री बुपहानी कॉलेजमध्ये होती.
बी.कॉम झाल्यानंतर श्वेता हिने तिचा मोर्चा अभिनयाकडे वळवला. अनेक ठिकाणी अभिनेत्रीने ऑडिशन देखील दिलं. 1999 मध्ये अभिनेत्री अभिनय विश्वात पदार्पण केलं. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेता हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.
पलक तिवारी देखील आई श्वेता हिच्यासारखी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पलक हिला सोशल मीडियावर कायम ट्रोल केलं जातं. पण पलक फक्त अभिनयातच नाहीतर, शिक्षणात देखील पुढे आहे. पलक तिवारी हिने मुंबईतील शाळेत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मिठीबाई कॉलेजमध्ये अभिनेत्रीने शिक्षण घेतलं.
पलक हिने सायकोलॉजीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय विश्वात पदार्पण केलं. पलक तिवारी हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत देखील चाहते असतात. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
पलक फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पलक तिवारी अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.