वादग्रस्त विधानामुळे श्वेता तिवारी अडचणीत, हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप; मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची तक्रार

श्वेता तिवारीच्या विरोधात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडून करण्यात आली आहे. नरोत्तम मिश्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की, मी तो व्हिडीओ स्वत:पाहिलेला आहे.

वादग्रस्त विधानामुळे श्वेता तिवारी अडचणीत, हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप; मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची तक्रार
अभिनेत्री श्वेता तिवारी (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 11:43 AM

मुंबई – टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हीच्यावर हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान तिने एक वादग्रस्त विधान (Shweta Tiwari Controversial Comment) केलं होतं. त्यानंतर श्वेता तिवारीच्या (FIR On Shweta Tiwari) विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भोपाळमध्ये (bhopal) आपली वेबसिरीज रिलीज दरम्यान श्वेताने स्टेजवर बसून देवाचे नाव घेत एक वादग्रस्त विधान केले होते. सोशल मीडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी श्वेतावर टीका केली आहे. तसेच माफी मागण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे. भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस स्टेशनमध्ये (hills police station) तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी अशी वादग्रस्त विधानं केली आहेत. तसेच त्यांनी माफी सुध्दा मागितली असल्याचे आपण पाहिले आहे. पण आता श्वेता तिवारी काय करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

श्वेता तिवारीच्या विरोधात मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडून करण्यात आली आहे. नरोत्तम मिश्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की, मी तो व्हिडीओ स्वत:पाहिलेला आहे. तसेच श्वेता तिवारी बोलत असल्याचे ऐकले सुध्दा असून मी त्याचा विरोध करतो. त्यामुळे भोपाळच्या पोलिस कमिशनर यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घालून चौकशी करावी. त्यानंतर श्वेता तिवारीवरीत कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी 24 तासाच्या आत करावी असं गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगितलं असून त्यानंतर तात्काळ कारवाई केली जाईल.

नेमकं काय आहे प्रकरण

अतिशय सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतीच भोपाळला एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिथं तिने कार्यक्रमादरम्यान देवाला जोडून वादग्रस्त विधान केलं. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला तेव्हाच ही अभिनेत्री श्वेता तिवारी वादात अडकण्याची शक्यता अनेका जाणकारांकडून वर्तवली जात होती. श्वेताच्या आगामी वेबसीरिजच्या लॉन्च इव्हेंटला पोहोचलेली ही अभिनेत्री कार्यक्रमात बाकीच्या कलाकारांसोबत स्टेजवर बसली होती, त्याचवेळी श्वेताच्या तोंडून हे वादग्रस्त विधान बाहेर पडले. त्यावेळी वेबसिरीजमध्ये असणारे सर्व कलाकार तिथे उपस्थित होते. प्रसिध्दी काही कलाकार असे करत असतात असे अनेक प्रकरणातुन दिसून आले आहे. तसेच एकदा वातावरण तापलं की ते जाहीर माफीही मागतात. पण मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिसांना चौकशीसाठी 24 तासांचा अवधी दिला आहेय त्यामुळे चौकशीनंतर पोलिस आणि मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Why I Killed Gandhi : नथुराम गोडसेवर आधारित चित्रपट आक्षेपांच्या पिंजऱ्यात, ओटीटीवर रिलीज होणार की नाही?, ‘सर्वोच्च’ याचिका

साऊथची टॉप अभिनेत्री, गाणंही गाते, कम्पोजही करते, बॉलिवूडमध्येही नाव कमावलं, टॅलेंटेड श्रृतीचा हॅपी बर्थडे!

Mahesh Manjrekar : महेश माजरेकरांच्या अडचणीत आणखी वाढ, चित्रपटातील दृश्य प्रकरण पोहोचलं कोर्टात

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....