Palak Tiwari | ‘जितके फॅन्स नाहीत तितके बॉडीगार्ड आहेत’; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'जितके तिचे चाहते नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त बॉडीगार्ड्स आहेत', असं एकाने लिहिलंय. तर 'हे जरा अतीच झालं', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'पलकने सलमान खानच्या चित्रपटात काम केलंय, म्हणून त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे', असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Palak Tiwari | 'जितके फॅन्स नाहीत तितके बॉडीगार्ड आहेत'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Palak Tiwari and Shweta TiwariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 6:53 PM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली. पलकने अवघ्या काही काळातच आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर ती विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच पलकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पलकच्या अवतीभवती पाच बॉडीगार्ड पहायला मिळत आहेत. नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या पलकला इतकी मोठी सुरक्षा पाहून नेटकरीसुद्धा अवाक् झाले आहेत.

पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये पलक चालताना दिसतेय आणि तिच्या आजूबाजूला एक दोन नव्हे तर पाच बॉडीगार्ड दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जितके तिचे चाहते नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त बॉडीगार्ड्स आहेत’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे जरा अतीच झालं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘पलकने सलमान खानच्या चित्रपटात काम केलंय, म्हणून त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पलक ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. सलमानच्या चित्रपटात भूमिका साकारण्याआधी ती हार्डी संधूच्या ‘बिजली’ या म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. हा म्युझिक अल्बम तुफान गाजला होता. इतकंच नव्हे तर सलमान आणि आयुष शर्माच्या ‘अंतिम’ या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शिकेचं काम केलं होतं.

बिग बाॅसच्या सेटवर पलकची पहिली भेट सलमान खानसोबत झाली होती. सलमानला ज्यावेळी पहिल्यांदा ती भेटली होती, त्यावेळी ती 8 वर्षांची होती. पलकने सांगितलं की, तेव्हापासून आजपर्यंत सलमान खान ही एकमेव व्यक्ती आहे ज्याने तिला तिच्या आयुष्यातील सर्वात चांगली गळाभेट दिली. पलकचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलं होतं. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आमच्यात फक्त मैत्री असल्याचं पलकने स्पष्ट केलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.