पलक तिवारी – इब्राहिम अली खान यांचं अफेअर, श्वेताचा पहिला नवरा म्हणाला, ‘ती सिंगर मदर आहे, म्हणून…’

Raja Chaudhary on Palak Tiwari Love Life: पलक तिवारी आणि इब्राहिम अली यांच्या रिलेशनशिपबद्दल श्वेताच्या पहिल्या नवऱ्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, 'ती सिंगर मदर आहे, म्हणून...', श्वेता तिवारी हिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव राजा चौधरी असं आहे..

पलक तिवारी - इब्राहिम अली खान यांचं अफेअर, श्वेताचा पहिला नवरा म्हणाला, 'ती सिंगर मदर आहे, म्हणून...'
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 11:07 AM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. श्वेता तिवारी स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना अनेक गोष्टी सांगत देखील असते. श्वेता हिचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 2007 मध्ये श्वेताने घटस्फोटाची घोषणा केली आणि लेक पलक तिवारी हिच्यासोबत राहू लागली. सांगायचं झालं तर, घटस्फोटादरम्यान श्वेताने पहिल्या नवऱ्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. पण अनेक वर्षांनंतर राजा याने मुलाखतीत श्वेता आणि लेक पलक यांचं कौतुक केलं. शिवाय पलक आणि इब्राहिम अली खान यांच्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

एका जुन्या मुलाखतीत राजा चौधरी म्हणाला होता की, ‘पलक एक आत्मविश्वासू मुलगी आहे. माझ्यासमोर ती एक चिमुकली मुलगी होती. पण आता सुंदर मुलगी झाली आहे. पलकला योग्यप्रकारे सर्वांसोबत बोलता येतं. ती जीममध्ये जाते… स्वतःला फिट ठेवते… शिवाय पलक कधी ड्रिंग किंवा धूम्रपान करत नाही…’ असं देखील राजा चौधरी म्हणाला होता.

View this post on Instagram

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

मुलाखतीत राजा याने पहिली पत्नी श्वेता हिच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘श्वेता एक व्यस्त आणि सिंगल मदर आहे. पण श्वेताने पलकला उत्तम संस्कार दिले आहे… जे दुसरं कोणी देऊ शकलं नसतं. ज्याने चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला हवं… श्वेताने चांगलं काम केलं आहे…’ असं देखील राजा चौधरी म्हणाला होता.

पुढे राजा चौधरी याला पलक आणि इब्राहिम अली खान यांच्या नात्याबद्दल देखील विचारण्यात आलं. ‘अशा चर्चा रंगत असतात, त्याचा काहीही फरक पडत नाही. पलक आता त्या वयात पोहोचली आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते… मी तिच्यासाठी आनंदी आहे… ती आनंदी आहे तर मी आनंदी आणि ती दुःखी आहे तर मी दुःखी…’ असं देखील राजा चौधरी मुलाखतीत म्हणाला.

पलक तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पलक हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.