Shweta Tiwari: ‘पैशांसाठी लग्न करते त्यानंतर नवऱ्याला…’, 2 घटस्फोटांवर श्वेता तिवारीचं खळबळजनक वक्तव्य

Shweta Tiwari: दोन अपयशी लग्न... दोन मुलांची जबाबदारी..., 2 घटस्फोटांनंतर श्वेता तिवारी म्हणते, 'पैशांसाठी लग्न करते त्यानंतर नवऱ्याला...', श्वेता तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून 'सिंगर मदर' म्हणून करतेय मुलांचा सांभाळ...

Shweta Tiwari: 'पैशांसाठी लग्न करते त्यानंतर नवऱ्याला...', 2 घटस्फोटांवर श्वेता तिवारीचं खळबळजनक वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 10:08 AM

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही खासगी आयुष्यांमुळए चर्चेत असते. दोन अपयशी लग्न आणि एकटी दोन मुलांचा सांभाळ करत असलेल्या श्वेता तिवारी हिने नुकताच झालेल्या मुलाखतीत घटस्फोटबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. होत असलेल्या ट्रोलिंगचा मला काहीही फरक पडत नाही… असं वक्तव्य श्वेता तिवारी हिने केलं आहे.

श्वेता तिवारी म्हणाली, ‘सोशल मीडियावर मल कायम माझ्याबद्दल विचित्र कमेंट पाहायला मिळतात. मी गोल्ड डिगर आहे… असे लोकांचे विचार आहेत. लग्न केल्यानंतर मी पैसे घेते आणि नवऱ्याला सोडून देते… असं देखील लोकं मला म्हणतात. अशा वाईट कमेंट करणाऱ्यांना फक्त असंच बोलायला आवडतं..’

‘मला काहीही फरक नाही पडत लोकं मला काय बोलतात, ते माझ्याबद्दल काय विचार करतात. मला जे करायचं आहे, तेच मी करते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. घटस्फोटानंतर श्वेता तिवारी एकटी दोन मुलांचा सांभाळ करत आहे. मुलासोबत अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.

श्वेता तिवारी हिचं पहिलं लग्न…

श्वेता तिवारी हिच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने राजा चौधरी याच्यासोबत लग्न केलं. राजा याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रींच्या कुटुंबियांना देखील ट्रोल करण्यात आलं होतं. दोघांना एक मुलगी आहे. मुलीचं नाव पलक तिवारी असं आहे. श्वेता आणि राज यांचं लग्न फक्त 9 वर्ष टिकलं. श्वेताने राजा चौधरी याच्यावर मारहाणीचे आरोप लावले होते.

श्वेता तिवारी हिचं दुसरं लग्न…

श्वेता तिवारी हिने दुसरं लग्न वयाच्या 43 व्या वर्षी केलं. श्वेताच्या दुसऱ्या पतीचं नाव अभिनव कोहली असं आहे. 13 जुलै 2013 मध्ये अभिनेत्री लग्न केलं. अभिनेत्रीचं दुसरं लग्न फक्त 6 वर्ष टिकलं. दोघांना एक मुलगा आहे. ज्याचं नाव रेयांश असं आहे. दोन घटस्फोट झाल्यानंतर श्वेता मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.