पाकिस्तानी सिनेमांमध्ये देखील झळकली आहे Shweta Tiwari! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्येच नाही तर, 'या' पाकिस्तानी सिनेमात देखील श्वेता तिवारीने साकारली महत्त्वाची भूमिका ! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

पाकिस्तानी सिनेमांमध्ये देखील झळकली आहे Shweta Tiwari! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 3:49 PM

मुंबई : ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तर, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताने पाकिस्तानी सिनेमांमध्ये देखील काम केल्याची सध्या चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये श्वेता एका अभिनेत्यासोबत रोमांटिक सीन करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र श्वेता तिवारी हिचा पाकिस्तानी सिनेमा आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. श्वेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सध्या ज्या कारणामुळे श्वेता चर्चेत आली आहे, तो किस्सा २०१२ मधील आहे. श्वेताने बॉलिवूड, भोजपुरी सिनेमांसोबत पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये काम केल्याची सध्या चर्चा रंगत आहे. हे ऐकल्यानंतर श्वेताच्या चाहत्यांना नक्की मोठा धक्का बसला असेल. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतानत द किंगडम’ या पाकिस्तानी सिनेमात श्वेताने भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

सिनेमात श्वेता तिवारी हिच्यासोबतच आकाश दीप, गोविंद, चेतन हंसराज यांसारखे कलाकार देखील झळकले होते. श्वेताचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते देखील हैराण झाले असतील. श्वेता टीव्ही विश्वाला राम राम ठोकत पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत आहे? अशा चर्चांनी देखील एकेकाळी जोर धरला होता.

पण एक पत्रकार परिषद घेवून अभिनेत्रीने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. अभिनेत्री म्हणाली, ‘पाकिस्तानी सिनेमात काम केलं याचा अर्थ असा होत नाही की, मी बॉलिवूड आणि टीव्ही विश्वाचा निरोप घेतला आहे…’ सध्या सर्वत्र श्वेताची चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकून देखील श्वेता आज टीव्ही विश्वाची क्विन म्हणून ओळखली जाते.

सोशल मीडियावर देखील श्वेताची कायम चर्चा रंगलेली असते. वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. ‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

आज श्वेता तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर श्वेता अनेकदा तिचे वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.