अमिताभ बच्चन यांच्या नातीला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर सिद्धांत चतुर्वेदीने सोडलं मौन
नव्या नवेलीला 'गली बॉय' करतोय डेट? अभिनेत्याची प्रतिक्रिया आली समोर
मुंबई- अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘गली बॉय’ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील त्याची कामगिरी पाहिल्यानंतर त्याला अनेक ऑफर्स मिळाल्या. काही महिन्यांपूर्वीच त्याने दीपिका पदुकोणसोबत ‘गहराईयाँ’ या चित्रपटात भूमिका साकारली. आता तो लवकरच इशान खट्टर आणि कतरिना कैफसोबत ‘फोन भूत’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटांसोबत सिद्धांत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सिद्धांतचं नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीसोबत जोडलं गेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि नव्याच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. यावर अखेर त्याने मौन सोडलं आहे. ‘फोन भूत’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांतला त्याच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मी कोणाला तरी डेट करतोय, ही बाब खरी असावी अशी माझीसुद्धा इच्छा आहे.”
सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे सिद्धांत आणि नव्या डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी नव्या एका हिल स्टेशनला फिरायला गेली होती. त्यावेळी तिने छतावर बसल्याचा फोटो पोस्ट केला होता. ‘चंद्राने फोटो काढला’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. तर दुसरीकडे सिद्धांतनेही त्याचा एक फोटो पोस्ट केला होता.
View this post on Instagram
सिद्धांतच्या फोटोवर नव्याने सूर्याचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली होती. सिद्धांतने ऋषीकेशमधील काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले होते. या व्हिडीओमध्ये ज्या छतावर नव्या बसली होती, तसंच दृश्य नेटकऱ्यांनी पाहिलं. ‘अपना मन और मून दोनो क्लिअर’, असं कॅप्शन सिद्धांतने व्हिडीओला दिलं होतं. या सर्व गोष्टींचा अंदाज बांधत नेटकऱ्यांनी नव्या आणि सिद्धांतच्या रिलेशनशिपवरून कमेंट्स करायला सुरुवात केली. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाल्यानंतर नव्याने तिच्या फोटोवरील कमेंट एडिट केलं आणि सिद्धांतच्या फोटोवरील तिची कमेंट डिलिट केली.
नव्या ही श्वेता बच्चन नंदाची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात आहे. नव्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र तिने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याऐवजी ती वडील निखिल नंदा यांचा व्यवसाय सांभाळणार असल्याचं म्हटलं जातंय.