50 खोके…, विरोधी पक्ष फोडायला…; ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील लक्षवेधी भारुड

Navra Majha Navsacha 2: 50 खोके..., विरोधी पक्ष फोडायला..., आमचा झेंडा...; 'नवरा माझा नवसाचा 2' मधील सिद्धार्थ जाधवने सादर केलेल्या भारुडाचा व्हिडीओ तुफान व्हायरल..., सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा...

50 खोके..., विरोधी पक्ष फोडायला...; 'नवरा माझा नवसाचा 2' मधील लक्षवेधी भारुड
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 9:16 AM

अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर स्टारर ‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 20 सप्टेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल झाला. सध्या सर्वत्र ‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. तब्बल 20 वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, सिनेमातील एका भारुडानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिनेमात अभिनेता सिद्धार्ध जाधव याने सादर केलेल्या भारुडाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सिनेमात सिद्धार्थ जाधव याने एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना सिद्धार्थ गणरायाकडे साकडं घालताना दिसत आहे. अशात सिद्धार्थ गणरायाला साकडं घालतोय की धमती देतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

‘सत्ताधारी खासदारकी लाभली मला मुकूट घालीन 50 खोक्यांचा तुला…’ असं सिद्धार्थ गणरायाकडे नवस बोलतो… यावर स्वप्नील जोशी ‘हे नवस बोलत आहेत की लाच देत आहेत…’ असा प्रश्न स्वप्नील जोशीला पडतो. विरोधी पक्षावर निशाणा साधत सिद्धार्थ म्हणतो, ‘जनतेचं भलं करायला, विरोधी पक्ष फोडायला बुद्धी दे आम्हाला…’, सिद्धार्थ जाधव याने सादर केलेलं भारुड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, अक्षय खोमाणे यांनी एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘भारूड मस्त मांडलं आहे… पन्नास खोके , विरोधी पक्ष फोडलेले मस्त मांडलं आहे… चांगलं कव्हर केलंय… खरं तर महाराष्ट्राची कलाकारांची परंपराच आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आमच्या कलाकारांनी, भारूड, पोवाडा, तमाशा,ओव्या, गीतांमधून जनप्रबोधन केलं आहे .आरसा दाखवला आहे…’ असं लिहिलं आहे.

धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.