किआरा आडवाणी हिच नाही तर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीही होत्या सिद्धार्थ मल्होत्रा याच्या गर्लफ्रेंड
'या' प्रसिद्ध अभिनेत्रींना देखील सिद्धार्थ मल्होत्रा याने केलय डेट; आता अभिनेता किआरा अडवाणी हिच्यासोबत अडकणार विवाहबंधनात
Sidharth Malhotra Girlfriends : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या सिद्धार्थ याच्या मनात मात्र अभिनेत्री किआरा अडवाणी आहे. सिद्धार्थ आणि किआरा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण किआरा हिच्याआधी सिद्धार्थने अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलं आहे. शिवाय अफ्रिकन मॉडेल निकोल मेयर हिला देखील सिद्धार्थने डेट केलं आहे.
किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ‘शेरशाहा’ सिनेमाच्या यशानंतर किआरा आणि सिद्धार्थ यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार किआरा आणि सिद्धार्थ ६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. पण अद्याप दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा सिद्धार्थ मल्होत्रा याच्या गर्लफ्रेंडच्या यादीमध्ये आलिया भट्ट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पण दोघांचं नातं फार काही टिकलं नाही. ब्रेकअपनंतर आलियाने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं आहे, तर सिद्धार्थ किआरा हिच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
तारा सुतारिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा ‘मरजावां’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांचं नाव एकमेकांना जोडण्यात आलं. पण आदर जैन याच्यासोबत नात्यात अडकल्यानंतर तारा आणि सिद्धार्थ दूर झाले. आता तारा आणि आदर यांचं देखील ब्रेकअप झालं आहे.
मॉडेल निकोल मेयर आणि सिद्धार्थ मल्होत्रा मॉडेल निकोल मेयर हिला डेट करत असल्याचा खुलासा अभिनेता सिद्धर्थ मल्होत्राने एका मुलाखतीत केला होता. सिद्धार्थचं हे नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.