सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी

हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय आहे.

सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 10:23 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 8 जूनला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट करण्यात आले, अशी माहिती सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याच्या केलेल्या चौकशीत समोर आली आहे. (Siddharth Pithani allegedly claimed Rhea Chakraborty destroyed Hard Disks in Sushant’s House)

हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय आहे. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता आहे.

तीन आयटी प्रोफेशनल्सना संपर्क केला गेला होता, एक जण घरी आला होता. माझ्या माहितीप्रमाणे रिया किंवा इतर कुणी बोलावलं असेल. ज्यावेळी डाटा नष्ट केला जात होता, तेव्हा तिथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थ पिठाणी याने सांगितल्याची माहिती आहे.

पहा व्हिडीओ :

सीबीआय सुशांत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्यात गुंतली आहे. क्वान कंपनीची टॅलेंट मॅनेजर जया साहा ही सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरण महत्त्वाचा दुवा ठरु शकते. जया साहा आणि दिशा यांनी क्वान कंपनीत एकत्र काम केले आहे.

जया 2009 पासून क्वानसाठी काम करत असून वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. तर दिशाने 2018 मध्ये क्वानमध्ये सुरुवात केली होती. मात्र अल्प काळातच तिने नोकरी सोडली. त्यानंतर दिशाने 2019 मध्ये कॉर्नर स्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी जॉइन केली.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी इम्तियाज खात्री नामक व्यक्तीसोबतचा सुशांतचा जुना (2017) व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. बॉलिवूड ड्रग माफियाशी संबंधित ही व्यक्ती सुशांतशी गैरवर्तन करत असल्याचा दावा कदम यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक मौन बाळगत आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या :

सुशांत स्वतः ड्रग्ज घ्यायचा की त्याला दिलं जायचं? सीबीआयचा नोकरांकडे मोर्चा, वॉचमनचीही चौकशी

आधी ड्रग्ज अँगल, आता बक्कळ पुरावे, सुशांत प्रकरणी सीबीआय रियाला अटक करण्याची शक्यता

सुशांत प्रकरणात ‘एम्स’ टीमकडे 12 महत्त्वाचे लीड्स, हत्येची शक्यता तपासण्याची सीबीआयला सूचना

“चहात 4 थेंब वापर, त्याला पिऊ दे, किक बसायला 30-40 मिनिटे दे” रियाच्या कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ‘ड्रग्ज अँगल’ समोर

(Siddharth Pithani allegedly claimed Rhea Chakraborty destroyed Hard Disks in Sushant’s House)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.