मुकेश अंबानी यांनी लग्नानंतर सिद्धार्थ – किआरा यांना दिली इतकी महागडी भेटवस्तू?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी यांच्या लग्नात अंबानी कुटुंबाची लेक ईशा अंबानी पतीसोबत उपस्थित होत्या. आता मुकेश अंबानी यांनी सिद्धार्थ - कियारा यांना एक मोठी भेटवस्तू दिली आहे... जाणून घ्या काय आहे गिफ्ट..

मुकेश अंबानी यांनी लग्नानंतर सिद्धार्थ - किआरा यांना दिली इतकी महागडी भेटवस्तू?
Sidharth Kiara Wedding
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 3:24 PM

Sidharth Kiara Wedding Gift Form Mukesh Ambani : अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी लग्न केलं आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये ७ फेब्रुवारी रोजी दोघांनी शाही अंदाजात लग्न केलं. आता सिद्धार्ध – किआरा यांच्या रिसेप्शन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. १२ फेब्रुवारी रोजी सिद्धार्ध – किआरा यांच्या लग्नानंतर जोरदार रिसेप्शन पार्टी होणार आहे. याचदरम्यान दोघांना अनेक भेटवस्तू मिळाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्ध – किआरा यांच्या कुटुंबाने देखील दोघांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

आता मुकेश अंबानी यांनी देखील सिद्धार्ध – किआरा यांना लग्नानंतर महागडी भेटवस्तू दिल्याची बातमी समोर येत आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सिद्धार्ध – किआरा यांना रिलायन्स ट्रेंड फुटवियर (Reliance Trends Footwear) चं नवीन ब्रॉन्ड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स रिटेलचे व्हेंचर ट्रेंड्स फुटवियरने दोघांनी नवीन ब्रॉन्ड अॅम्बेसेडर बनवत असल्याची माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

रिलायन्स रिटेल लिमिटेडचे फॅशन आणि लाइफस्टाइलचे अध्यक्ष आणि सीईओ अखिलेश प्रसाद म्हणतात, ”कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलीवूडचे सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान युवा आयकॉन आहेत, दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याने तरुणांसोबत असलेलं आमचं नाते अधिक घट्ट होईल.”

सांगायचं झालं तर, अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या भेटवस्तूनंतर सिद्धार्थ – किआरा प्रचंड आनंदी आहेत. किआरा आणि अंबानी कुटुंबाचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. किआरा आणि अंबानी कुटुंबाची लेक ईशा अंबानी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. किआराच्या लग्नात ईशा अंबानी यांनी पती आनंद पीरामल यांच्यासोबत पोहोचली होती.

आता मुंबई याठिकाणी होणाऱ्या रिसेप्शन पार्टीमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची आणि मुकेश अंबानी यांनी लग्नानंतर दोघांना दिलेल्या भेटवस्तूची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, रिलेशनशिपमध्ये असताना सिद्धार्थ – किआरा यांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. शिवाय लग्नाच्या तारखेबद्दल देखील कोणतीही घोषणा केली नाही. लग्न झाल्यानंतर अखेर दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट नात्याची कबुली दिली.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली. (kiara advani and sidharth malhotra relationship)

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.