सिद्धार्थ – किआरा यांचं New year सेलिब्रेशन; अभिनेत्रीचा सासूसोबत फोटो व्हायरल

| Updated on: Dec 30, 2022 | 2:21 PM

नवीन वर्षी किआरा - सिद्धार्थ अडकणार विवाहबंधना? अभिनेत्रीचा सासूसोबत फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

सिद्धार्थ - किआरा यांचं New year सेलिब्रेशन; अभिनेत्रीचा सासूसोबत फोटो व्हायरल
Sidharth and Kiara
Image Credit source: Instagram
Follow us on

Sidharth Kiara Wedding News: अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण ‘शेरशहा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सिद्धार्थ-किआराच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर धरलं. मध्यंतरी अनेकदा दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं समोर आलं. दरम्यान दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. नुकताच सिद्धार्थ-किआराला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

दोघे नव्या वर्षाचं एकत्र स्वागत करणार आहेत. जेव्हा सिद्धार्थ-किआराला एकत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा कोणाला माहिती नव्हतं दोघे कोठे नव्या वर्षाचं स्वागत करणार आहेत. दरम्यान दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये फक्त किआरा-सिद्धार्थ नसून अन्य सेलिब्रिटी देखील आहेत. महत्त्वाचं म्हणजे फोटोमध्ये किआराची सासू देखील दिसत आहे. २०२३ नव वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धार्थ – किआरा दुबईमध्ये आहेत. (Kiara Sidharth in Dubai) दुबईतील सेलिब्रिटींचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

समोर आलेला फोटो रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) च्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. फोटोमध्ये रणबीरची बहिण रिद्धिमा, फॅशन डिझायनर करण जोहर, किआरा अडवाणी आणि सासू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर दिसत आहेत. ‘जुग जुग जियो’ (Jugg Jugg Jeeyo) चित्रपटात नीतू कपूर यांनी किआराच्या सासूच्या भूमिकेला न्याय दिला होता.

सिद्धार्थ आणि किआराबद्दल सांगायचं झालं तर, दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सिद्धार्थ आणि किआरा कधी विवाहबंधनात अडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.