New Song : सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल या जोडीचं नवं गाणं, ‘सिद-नाझ’च्या ‘शोना शोना’चे पोस्टर प्रदर्शित
सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांना उद्या आणखी एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. ही भेट सिद्धार्थ शुक्ला आणि स्वत: शहनाज गिल देणार आहेत. ‘सिद-नाझ’ या जोडीचं दुसरं व्हिडीओ गाणं उद्या, अर्थात 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांना उद्या आणखी एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. ही भेट सिद्धार्थ शुक्ला आणि स्वत: शहनाज गिल देणार आहेत. ‘सिद-नाझ’ या जोडीचं दुसरं व्हिडीओ गाणं उद्या, अर्थात 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओ गाण्याचे नाव ‘शोना शोना’ असे आहे. सिध्दार्थ-शहनाजचे चाहते या गाण्याबद्दल खूप उत्सुक आहेत आणि त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.या गाण्याची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ट्विटर ट्रेंडवर हे गाणं टॉप 3 मध्ये आहे.(Sidharth Shukla and Shehnaaz Gill’s new song poster released)
हे गाणं टोनी कक्कर आणि नेहा कक्कड़ यांनी गायलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता ‘शोना शोना’ हे गाणं प्रदर्शित होईल. सिद्धार्थ शुक्ला यांनी या गाण्याचे पोस्टर आज (24 नोव्हेंबर) इंन्सटाग्रामवर पोस्ट केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘या गाण्यात शहनाज आणि सिद्धार्थची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.’ याआधीही सिद्धार्थने या गाण्याचे पोस्टर प्रसिद्ध केले होते.
View this post on Instagram
दरम्यान सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 14 मध्ये स्टॉर्मी सीनियरच्या भूमिकेत दिसला होता. एका वृत्तानुसार, बिग बॉस 14 च्या घरात सिद्धार्थ शुक्लाला दोन आठवड्यांसाठी 12 कोटी रुपये देण्यात आले होते. कारण गेल्या हंगामात बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून आणि या हंगामात पाहुणा म्हणून सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस’च्या घरात दिसला होता. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ शुक्ला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा स्टार झाला आहे. चांगल्या प्रसिद्धीमुळे आणि मोठा फॅन क्लब असल्यामुळे सिद्धार्थ प्रत्येक कार्यक्रमाची भरघोस फी घेतो.
बिग बॉसच्या निर्मात्यापेक्षाही सिद्धार्थ शुक्लाची फी जास्त असल्याचं बोललं जात होत. सलमान खान सुद्धा बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे. त्यामुळे तो कार्यक्रमासाठी किती फी घेतो, हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता सलमान खानच्या फीसमोर ही रक्कम तर शुल्लक आहे. पण एखाद्या टीव्ही अभिनेत्याला एवढी मोठी रक्कम मिळावी ही आश्चर्याची बाब आहे. राधे माँ आहे सगळ्यात महागडी स्पर्धक? यंदाच्या बिग बॉसमध्ये राधे माँ हे एक नाव चर्चेचा विषय ठरलं आहे. या सीझनमध्ये राधे माँने सगळ्यात जास्त फी घेतली असल्याचं बोललं जात होत. मीडिया रिपोर्टनुसार, राधे माँ प्रत्येक आठवड्याचे 25 लाख रुपये घेते.(Sidharth Shukla and Shehnaaz Gill’s new song poster released)
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!
Bigg Boss 14 | ‘पंजाबी जीजा’ सिद्धार्थनेच सारा गुरपालला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढले!