वयाच्या 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर
गायक सिद्धू मूसेवाला याच्या निधनानंतर आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी घेतला दुसऱ्यांदा आई होण्याचा निर्णय... नव्या पाहुण्याच्या जन्मानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण... गायकाच्या वडिलांचा बाळासोबत फोटो आला समोर...
मुंबई | 17 मार्च 2024 : दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिद्धू मूसेवाला याच्या कुटुंबात आता आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती की, सिद्धू मूसेवाला याची आई चरण कौर वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहेत. रिपोर्टनुसार, सिद्धू मूसेवाला याच्या आईने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चरण कौर यांनी मुलाला जन्म दिल्याची माहिती खुद्द गायकाचे वडील बलकौर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र सिद्धू मूसेवाला याचे वडील आणि लहान भावाच्या फोटोची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सिद्धू मूसेवालाचे वडील लहान भाऊ दिसत आहे. तर सिद्धू मूसेवालाचा एक फोटो देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धू मूसेवाला याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
गोंडस मुलाचा फोटो पोस्ट करत सिद्धू मूसेवालाचे वडील म्हणाले, ‘शुभदीप याच्या लाखो-करोडो चाहत्यांच्या आशीर्वादाने देवाने शुभच्या लहान भावाला आमच्या पदरात टाकलं आहे. देवाच्या आशीर्वादाने कुटुंब स्वस्थ आहे. सर्व शुभचिंतकांचे आभार आणि धन्यवाद…’ गायकाचे वडील बलकौर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गायकाचे वडील बलकौर यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहते सिद्धू मूसेवालाच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सांगायचं झालं तर, सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झााडून हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
सिद्धू मुसेवाला याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात आहे. आज देखील सिद्धू मुसेवाला याची गाणी ऐकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ज्यामुळे आजही गायकाची मोठी कमाई होते. युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही सिद्धू मुसेवाला याची कमाई होते.