अल्का याज्ञिक यांना अचानक ऐकू येणं झालं बंद; या दुर्मिळ आजाराचं कारण, लक्षणे काय? कसा होऊ शकतो बरा?

प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या आजारपणाविषयीची माहिती दिली. सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस हा दुर्मिळ आजार निदान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या आजाराची कारणं काय, लक्षणे कोणती असतात, याविषयी माहिती जाणून घ्या..

अल्का याज्ञिक यांना अचानक ऐकू येणं झालं बंद; या दुर्मिळ आजाराचं कारण, लक्षणे काय? कसा होऊ शकतो बरा?
गायिका अल्का याज्ञिकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 3:24 PM

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायलेल्या गायिका अल्का याज्ञिक यांच्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अल्का यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची समस्या असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे त्यांना अचानक ऐकू येणं बंद झालंय. अल्का यांची ही पोस्ट वाचून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा त्या विमानातून बाहेर पडल्या, तेव्हा अचानक त्यांना ऐकू येणं बंद झालं होतं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या दुर्मिळ समस्येचं निदान झालं. व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले. मात्र अल्का यांची पोस्ट वाचल्यानंतर अनेकांच्या मनात सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसविषयी विविध प्रश्न उपस्थित झाले. हे कशामुळे होतं, त्याची लक्षणे काय असतात आणि ते होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी.. याविषयीची माहिती जाणून घेऊयात..

दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस म्हणजे काय?

कानाच्या आतील बाजूला किंवा कानापासून मेंदूपर्यंत ध्वनी प्रसारित करणाऱ्या मज्जातंतूंना झालेल्या हानीमुळे श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. यालाच सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस (rare sensorineural nerve hearing loss) असं म्हणतात. याला दुर्मिळ यामुळे म्हटलं जातं कारण श्रवणशक्ती कमी होणाऱ्या सर्व प्रकरणांपैकी हे फक्त 5 ते 15 टक्क्यांमध्ये आहे.

कारणं काय?

सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस होण्याची बरीच संभाव्य कारणं आहेत. त्यापैकी काही जन्मापासूनच असू शकतात. तर काही अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान झालेल्या गुंतागुंतांमुळेही ही समस्या होऊ शकते. याव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही अशा प्रकारचं हिअरिंग लॉस होऊ शकतं. यामध्ये पुढील कारणांचा समावेश असू शकतो..

हे सुद्धा वाचा
  1. मोठा आवाज- मोठ्या आवाजात दीर्घकाळ राहिल्याने कानाच्या आतील पेशींना इजा होऊ शकते, ज्यामुळे श्रवणशक्ती कमी होते. सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसचं हे सर्वांत सामान्य कारण आहे.
  2. वृद्धत्व- जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात. वयानुसार कानातील पेशी कमकुवत होत जातात. यामुळेही श्रवणशक्तीवर परिणाम होतो.
  3. संक्रमण आणि रोग- काही संक्रमण आणि रोगांमुळेही ऐकू येण्यावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये मेनिंजायटीस, गलगंड, गोवर आणि मेनियरसारख्या स्वयंप्रतिकार रोगांचा समावेश आहे.
  4. दुखापत- डोक्याला झालेली दुखापत किंवा कानाला झालेल्या आघातामुळे श्रवणाच्या मज्जातंतूचं नुकसान होऊ शकतं. यामुळे सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस होऊ शकतो.
  5. ऑटोटॉक्सिक औषधं- अँटिबायोटिक्स आणि केमोथेरपीच्या औषधांमुळेही कानाच्या आतील पेशींवर परिणाम होऊ शकतो. यामुळेही श्रवणशक्ती कमी होऊ शकते.

लक्षणे कोणती?

सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात. काही सर्वसामान्य लक्षणं पुढील असू शकतात.. – इतरांचं बोलणं समजण्यात अडचण – भुनभुनणारा किंवा घुमणारा आवाज – कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं, गुंजणं किंवा हिसक्याचा आवाज – मोठा आवाज ऐकण्यात अडचण – संतुलनात समस्या

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास, योग्य निदान आणि उपचारासाठी ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

उपचाराचे पर्याय कोणते?

दुर्दैवाने, सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस हे सर्वसामान्यपणे कायम स्वरुपाचं असतं आणि ते पूर्ववत केलं जाऊ शकत नाही. मात्र, जाणवणाऱ्या लक्षणांसाठी आणि ही समस्या असलेल्यांचं आयुष्य थोडंफार सुकर करण्यासाठी अनेक उपचारांचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये औषधोपचार, कॉक्लिअर इम्प्लांट, श्रवण यंत्र आणि सहाय्यक ऐकण्याची उपकरणं यांचा समावेश आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.