आतिफ अस्लमच्या कॉन्सर्टमध्ये महिलेने काय केलं? भावूक होत गायकाने…, व्हिडीओ व्हायरल
Atif Aslam Female Fan | आतिफ अस्लम याच्या कॉन्सर्टमध्ये 'या' महिलेचा बोलबाला, थेट स्टेजवर आली, गायका समोर रडू लागली, भावूक होत गायकाने देखील... व्हिडीओ तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आतिफ अस्लम याच्या व्हिडीओची चर्चा...
प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आतिफ अस्लम याच्या चाहत्यांची संख्या जगभरात फार मोठी आहे. आतिफ याने त्याच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या गाण्यांची क्रेझ फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहे. आपल्या गाण्यांनी आणि आवाजाने लोकांमध्ये एक वेगळी ओळख बनवलेल्या आतिफ अस्लमचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून गायकाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गायकाच्या आवाजाची चर्चा रंगली आहे.
गेल्या आठवड्यात, आतिफ याने बांगलादेशात एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले, त्या दरम्यान एक महिला चाहती स्टेजवर आली आणि गायकाला समोर पाहून प्रचंड भावूक झाली. महिला कोणत्याची गोष्टी पर्वा न करता सुरक्षारक्षकांसमोर स्टेजवर पोहोचली.
महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आतिफ महिलेचे अश्रू पुसताना दिसत आहे. शिवाय गायकाने महिला चाहतीला शांत करण्याचा देखील प्रयत्न केला. पण महिला गायकाला सोडण्यासाठी तयार नसल्याचं चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर गार्डने महिलेला सुरक्षित स्टेज खाली उतरवलं..
A crazy Bangladeshi fan gets emotional at Atif Aslam’s last night show in Dhaka. pic.twitter.com/U6ZewXfKZp
— Nznn Ahmed (@na_nznn) April 20, 2024
सोशल मीडियावर गायकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना देखील व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘महिला चाहतीला आतिफ सभ्यता आणि संवेदनशीलतेने भेटला..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आतिफ प्रचंड दयाळू आहे…’, एवढंच नाहीतर, आतिफ याच्या चाहत्यांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
आतिफ याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जवळपास सात वर्षांनंतर गायक बॉलिवूडसाठी गाणार असल्याची माहिती समोर येत आहेत. ‘एलएसओ 90’ सिनेमासाठी आतिफ गाणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आतिफ याची चर्चा रंगली आहे.
आतिफ याने बॉलिवूडसाठी अनेक गाणी गायली आहेत. जिनमें ‘तेरा होने लगा हूं’, ‘तेरे संग यारा’, ‘मैं रंग शरबतों का’ आणि ‘दिल दियां गल्ला’ यांसारखी अनेक गाणी आतिफ याने गायली आहेत. आजही आतिफ याची गाणी तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने ऐकतात.