स्त्रियांबद्दल सतत विचित्र गोष्टी…, रॅपर्सवर भडकली नेहा भसीन, संताप व्यक्त करत म्हणाली…
Neha Bhasin: मुलाने केलं तर भाऊ डुड आणि मुलीने कलं तर 'कॅरेक्टर ढीला..', रॅपर्सवर भडकली नेहा भसीन, संताप व्यक्त करत म्हणाली..., नेहा कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे असते चर्चेत
‘बिग बॉस ओटीटी’च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली गायिका नेहा भसीन सध्या तुफाम चर्चेत आली आहे. नेहा तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर नेहा कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. आता देखील असंच काही झालं आहे. आता नेहा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून रॅपर्सवर निशाणा साधला आला… तर जाणून घेऊ नक्की काय आहे प्रकरण…
नेहा भसीनने गेल्या बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिलं, मी त्या सरासरी पुरुष रॅपर्सना कंटाळली आहे, जे त्यांच्या गाण्यांमध्ये कायम महिलांबद्दल विचित्र गोष्टी बोलत असतात आणि भारतीय पुरुष आणि महिलांना देखील यावर तक्रार नसते. भारतात हिप्पोक्रेसीची काही मर्यादा आहे की नाही? मुलाने केलं तर भाऊ डुड आणि मुलीने कलं तर ‘कॅरेक्टर ढीला..’
कोणत्याच पुरुष रॅपरचं नाव न घेता नेहा म्हणाली, ‘माझ्याकडे कोणता पिंजरा नाही, जो मला खोलायता आहे. मी कोणती दूध मलाई नाही… आता मोठे व्हा…’, नेहा हिची पोस्ट काही लोकांना आवडली, तर अनेकांनी नेहाला ट्रोल देखील केलं आहे. नेहाच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
एक नेटकरी पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘तुम्हारा कैरेक्टर ढीला ही है….’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘जेवढे फ्रस्टेटेड लोकं आहेत. त्यांना असंच वाटतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नेहा भसीन हिच्या पोस्ट ची चर्चा रंगली आहे.
नेहा भसीन हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने इंडस्ट्रीमधील अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. अस्सलाम-ए-इश्कुम गाना, मेरे ब्रदर की दुल्हन, स्वैग से स्वागत यांसारख्या गाण्यांना नेहा हिने आवाज दिला आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
View this post on Instagram
नेहा भसीन सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील नेहाच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.