अखेर घटस्फोटावर बोलताना दिसली नेहा कक्कर, खासगी आयुष्यात नेमके काय आणि..

Neha Kakkar Divorce : नेहा कक्कर ही कायमच चर्चेत असते. नेहा कक्कर हिच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे काही दिवसांपासून सांगितले जात होते. हेच नाही तर तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पती उपस्थित नसल्याचे ते फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता यावर शेवटी नेहा कक्करने माैन सोडले आहे.

अखेर घटस्फोटावर बोलताना दिसली नेहा कक्कर, खासगी आयुष्यात नेमके काय आणि..
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 11:30 AM

मुंबई : गायिका नेहा कक्कर ही कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सतत उलट सुलट चर्चा या बघायला मिळत आहेत. हेच नाही तर नेहा कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासूनही दूर आहे. नेहा कक्कर हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे देखील सांगितले जातंय. नेहा कक्कर 2022 मध्ये इंडियन आयडल शोमध्ये जज म्हणून दिसली. त्यानंतर नेहा गायब झाली. रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर घटस्फोट घेत असल्याचे सातत्याने चर्चा जोर धरू लागलीये.

आता नुकताच नेहा कक्कर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे करताना नेहा कक्कर दिसलीये. नेहा कक्कर हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही भाष्य केले. नेहा कक्कर म्हणाली की, मी खूप लहान वयातच काम सुरू केले. मी जी गोष्ट करत आहे तिथे माझे 100 टक्के देते. मी कित्येक वर्षांपासून शो करत आहे.

मुळात म्हणजे मला ब्रेकची गरज होती. मी खूप जास्त थकले होते, म्हणून मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मुळात म्हणजे माझे लग्न झाल्यापासूनच माझ्या घटस्फोटाबद्दल आणि प्रेग्नंसीबद्दल भाष्य केले जाते. मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते. मी या गोष्टींकडे लक्षच देत नाही. कारण मला माहिती आहे की, सत्य काय आहे आणि काय नाही.

मी मेंटली आणि फिजिकली थकले होते, म्हणून मी ब्रेक घेतला. पुढे नेहा कक्कर म्हणाली की, मी आता पूर्ण ताकदीने पुनरागमन करणार आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचे लग्न 2021 मध्ये झाले. सतत यांच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसतात. रोहनप्रीत आणि नेहा कक्कर यांचे लव्ह मॅरेज झालेले आहे.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाला आता 3 वर्ष झाली आहेत. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्यामधील वाद टोक्याला गेल्याचे सांगितले जात होते. हेच नाही तर आता हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. आता शेवटी यावर बोलताना थेट नेहा कक्कर ही दिसली आहे. नेहाच्या विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.