Rahul Disha | राहुल वैद्य याच्या घरी हलला पाळणा, दिशा परमार हिने दिला गोंडस बाळाला जन्म

राहुल वैद्य हा कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असतो. राहुल वैद्य हा नेहमीच पत्नी दिशा परमार हिच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. राहुल वैद्य याची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Rahul Disha | राहुल वैद्य याच्या घरी हलला पाळणा, दिशा परमार हिने दिला गोंडस बाळाला जन्म
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 9:01 PM

मुंबई : राहुल वैद्य हा कायमच चर्चेत असतो. राहुल वैद्य (Rahul Vaidya) याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. राहुल वैद्य याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राहुल वैद्य हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. राहुल वैद्य हा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना देखील दिसतो. राहुल वैद्य हा बिग बाॅस 14 मध्ये सहभागी झाला. यावेळी जबरदस्त असा गेम खेळताना देखील तो दिसला. थोडक्यात बिग बाॅस 14 चा ताज राहुल वैद्य याचा हुकला.

राहुल वैद्य हा बिग बाॅस 14 मध्ये असताना त्याने दिशा परमार हिला प्रपोज केला. विशेष म्हणजे दिशा परमार हिच्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत खास प्रकारे तिला विश करत त्याने प्रपोज केला. यामुळे जोरदार चर्चा रंगली. दिशा परमार ही राहुल वैद्य याला भेटण्यासाठी बिग बाॅसच्या घरात देखील आली. तेंव्हापासूनच राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची लव्ह स्टोरी चर्चेत आहे.

बिग बाॅस 14 मधून बाहेर पडल्यानंतर मुंबईमध्ये अत्यंत शाही पद्धतीने राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला. अनेक मोठे कलाकार या लग्नसोहळ्यास उपस्थित होते. या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. तब्बल दोन दिवस यांचा शादी विवाहसोहळा सुरू होता.

काही दिवसांपूर्वीच दिशा परमार ही प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा बघायला मिळाली. विशेष म्हणजे दिशा परमार हिने बेबी बंपमध्ये खास फोटोशूटही केले. या फोटोशूटमध्ये दिशा परमार हिचा जबरदस्त असा लूक दिसला. आता नुकताच राहुल वैद्य याने एक अत्यंत मोठी अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. गणेश चतुर्थीच्या दिवशी दिशाने गोंडस बाळाला जन्म दिलाय.

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे आता आई बाबा झाले आहेत. शेवटी राहुल वैद्य याच्या घरी पाळणा हलला आहे. दिशा परमार हिने एका चिमुकलीला जन्म दिलाय. इतकेच नाही तर यावेळी राहुल वैद्य याने सांगितले की, बाळाची आणि आईची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आता दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळतंय.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांना चाहते हे मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देताना दिसत आहेत. दिशा परमार हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दिशा परमार हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनीच केली. दिशा परमार हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.