रानू मंडलला असं पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का, व्हिडीओ पाहून म्हणाले, ‘एटीट्यूड हो तो ऐसा…’
Ranu Mandal: अनेक दिवसांनंतर रानू मंडल पुन्हा चर्चेत... त्यांना असं पाहिल्यानंतर चाहत्यांना बसला मोठा धक्का... व्हिडीओ तुफान व्हायरल... चाहते म्हणाले, 'एटीट्यूड हो तो ऐसा...'
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना (Ranu Mandal) चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळालं. रानू मंडल यांचा पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवरील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामान्यांसह बॉलिवूडमधील गायक आणि संगीतकार यांनी रानूचे कौतुक केलं. दरम्यान, अनेक वर्ष गायब असलेल्या रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रानू मंडल यांना पाहिल्यानंतर पुन्हा त्यांच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.
सोशल मीडिया इफ्लुएन्सर अंकिता मुखर्जी हिने रानू मंडल यांच्यासोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अंकिता, रानू यांच्याकडे पाहन ‘तू तो साड्ढी केयर नहीं करदा’ हे गाणं गाताना दिसत आहे. तर रानू मंडल यांच्या एक्सप्रेशनने चाहत्यांचं लक्ष लेधलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत…
रानू मंडल आणि अंकिता यांच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘रानू मंडलला फक्त तेरी मेरी मेरी तेरी गाणं येतं’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आजींचं अभिनय…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘एटीट्यूड हो तो ऐसा…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आज अनेक दिवसांनंतर दिसल्या रानू मंडल…’
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, रानू यांचं पहिले गाणं ‘तेरी मेरी कहाणी’ प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली आहे. हिमेश रेशमिया (Himesh Reshmiya) यांच्यासोबत गायलेलं गाणं हिट झाल्यानंतर आात गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी देखील रानू यांना गाणं गाण्यासाठी ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती.
रेल्वे स्थनाकावरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडल यांच्या मधूर आवाजानं साऱ्यांनाच चांगलीच भूरळ घातली. सोशल मीडियावर त्यांचं अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. त्यांना प्रसिद्धी देखील मिळाली. पण आता रानू मंडल बॉलिवूडपासून दूर आहेत.